आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dead Body Spread Around Capuchin Catacombs In Palermo, Sicily

येथे ठिक-ठिकाणी आहेत DEAD BODY, भितीने ओसाड पडलीत अनेक गाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीच्या कापूचिन कॅटाकॉम्बमध्ये ठेवण्यात आलेले मृतदेह - Divya Marathi
इटलीच्या कापूचिन कॅटाकॉम्बमध्ये ठेवण्यात आलेले मृतदेह
रोम- इटलीच्या सिसलीमध्ये एका ठिकाणी कापूचिन कॅटाकॉम्ब आहे. येथे 16व्या दशकात जवळपास 18 हजार मृतदेह ठेवण्यात आले आहेत. हे ठिकाण आतून जितके भयावह आहे, तितकेच इथपर्यंत पोहोचण्याचा रस्तासुध्दा भयावह आहे. याचा रस्ता गडद अंधारातून जातो आणि या रस्त्याच्या भिंतीवरसुध्दा मृतदेह लटकलेले असतात.
जाणून घ्या यामागील अफवांचे रहस्य...
प्राचीन रोममध्ये अंडरग्राऊंड कब्रिस्टानविषयी अनेक अफवा आहेत. अनेक दिवसांपासून याविषयी एक भ्रम आहे, की नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो लोक एकाचवेळी मारले गेले होते. त्या लोकांना येथे दफन करण्यात आले. या ठिकाणाच्या आजूबाजूचे सर्व गावे रिकामे आहेत. असे म्हटले जाते, की यातील काही मृतदेह आजही जिवंत आहेत. त्यामुळे येथे साथीचा रोग पसरतो.
काय आहे सत्य?
हे ठिकाण कब्रिस्तान आहे. येथे मृतदेह ठेवण्यासाठी विविध विभाग बनवलेले आहेत. जसे, महिला, पुरुष, मुले, अविवाहित तरुणी, शिक्षक, डॉक्टर, सैनिक यांच्यासाठी वेगवेगळे विभाग. 1880मध्ये अधिकृतरित्या हे कब्रिस्तान बंद करण्यात आले होते. तरीदेखील अनेकदा काही मृतदेह येथे येतात. 1920मध्ये या कब्रिस्तानमध्ये शेवटचा मृतदेह आला होता. तो एका मुलीचा होता. तिचे नाव रोसलिया लबाडरे होते. ही ममी या कब्रिस्तानमध्ये ठेवलेली सर्वात सुंदर ममी आहे. तिला पाहून असे वाटते, की एखादी गोंडस मुल झोपले आहे.
कापूचिनची स्थापना कॅथोलिक संतांची ममी सुरक्षित करण्यासाठी झाली होती. परंतु नंतर या कब्रिस्तानमध्ये जागा मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचा सामाजातील दर्जा ग्राह्य धरला जाऊ लागला. येथे ममी ठेवण्यासाठी नियमितरित्या पैसे भरावे लागते. जर एखाद्या मृतदेहाचे पैसे येणे बंद झाले तर तो मृतदेह तिथून काढून टाकला जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या कब्रिस्तानचे फोटो...