विंडहोक (नामिबिया)- येथील नॅशनल पार्कमध्ये मुंगूसाने एका भयावह सापाची शिकार केली. याचे लाइव्ह फोटोसुध्दा कॅमे-यात कैद झाले आहेत. ब्लूमस्लँग प्रजातीचा हा साप खूप विषारी असतो. चावल्यानंतर मनुष्याचा मृत्यू होतो. परंतु मुंगूसाने चातुर्याने सापाची शिकार केली.
कसा केला हल्ला...
स्थानिक लोकांनी सांगितले, की साप नामिबियाच्या इतोशा नॅशनल पार्कमध्ये एका झाडावर आराम करत होता. तेव्हा त्याच्याजवळ एक मुंगूस पोहोचला. मुंगूसाने हल्ला केल्यानंतर सापाने त्याला झटका दिला, परंतु यशस्वी होऊ शकला नाही. मुंगूसाचा पहिलाच वार इतका जोरात होता, की सापाला त्याच्यापुढे शरणागती पत्कारावी लागली. दक्षिण आफ्रिकेत राहणा-या 48 वर्षीय एलेना एरास्मनने हे फोटो केले आहेत. तो नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी आला होता.
मॉर्निंग फोटोग्राफी सीझननंतर तो कॅम्पकडे परतला होता. तेव्हा गाईडने मुंगूसाला सापाकडे जाताना पाहिले होते. त्याला जाणीव झाली, की तो जे पाहत आहे, ते खूप अनोखे आहे. त्याने सांगितले, की सापाने स्वत:ला वाचवण्यासाठी खूप प्रयस्न केले होते, मात्र मुंगूसाने त्याला सोडले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे PHOTOS...