आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is Death Railway Of Thailand Causing The Death Of 120.000 Men

हा आहे थायलँडचा \'डेथ रेल्वे\' मार्ग, तयार करण्यासाठी 1.20 लाख लोकांनी गमावलाय जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थायलँडचा 'डेथ रेल्वे' रूट)
थायलँडचा 'द बर्मा रेल्वे रुट' हा जगातील सर्वात भयावह रेल्वेट्रॅकपैकी एक आहे. या मार्गावर मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. याला बनवण्यासाठी जवळपास एक लाख 20 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. डेथ रेल्वे नावाने बदनाम हा रेल्वे रुट 415 किमी (285 मैल) लांब आहे. हा रुट थायलँड आणि बर्माच्या रंगूनला जोडतो. हा रुटमध्ये क्वाई नदीवर बनवलेल्या डेव्हिड लिआनच्या ब्रिजची कथासुध्दा भयावह आहे.
थायलँड-बर्माच्या मध्ये बनवलेल्या या रेल्वे रुटची कथा दुस-या महायुध्दापासून सुरु होते. जापानला बर्माच्या मोर्च्यावर ब्रिटेन-अमेरिकेच्या सैनिकांशी लढत असलेल्या आपल्या सैनिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी हा रेल्वेमार्ग बनवणे गरजेचे होते. कारण समुद्रीमार्ग शत्रुंच्या तावडीत होता. हा रेल्वेरुट बनवण्यासाठी अनेक वर्षे लागणारे होते, मात्र जवळपास एका वर्षात (जून 1942-ऑक्टोबर 1943) बनवण्यात आला. याला बनण्यासाठी जापानने युध्दात पकडलेल्या ऑस्ट्रेलिया, ब्रिटीश, अमेरिका आणि डचच्या सैनिकांचा वापर केला. हा रेल्वेरुट बनवण्यासाठी आशियाई लोकसुध्दा सामील होते. त्यामध्ये भारतातून मल्याळम आणि तामिळमधील लोक होते.
कामगारांकडून 18-18 तास काम करून घेतले जात होते. येथे 24-24 तास पाऊस पडायचा, तरीही बंधक लोकांकडून काम केले जात होते. या कामगारांना केवळ 250 ग्राम तांदूळ खाण्यासाठी दिले जात होते. दलदलीच्या या क्षेत्रात मच्छरांमुळे कामगारांना डेंगू, मलेरिया झाला आणि मोठ्या संख्येत त्यांचा मृत्यू झाला होता. कॉलरामुळे प्रत्येकदिवशी 20 कामगारांचा मृत्यू होत असे. जापानींनी या लोकांकडून आजारपणातसुध्दा काम करून घेतले होते.
थ्री पॅगोडा पासच्या पुलाला बनवण्यासाठी 1700 बंधक कामागारांना काम करण्यासाठी पाठवण्यात आले होते. पुल आठ महिन्यात तयार झाला, मात्र ऑक्टोबरमध्ये केवळ 400 लोक येथून परत जाऊ शकले. यातील काही लोकांना चँगीला पाठवण्यात आले, तिथे 200 लोकांचा मृत्यू झाला.
scottmurray.comनुसार, या रेल्वेरुटला बनवण्यासाठी किती लोकांनी प्राण गमावले याचा आकडा येथे आहे.
काम करणारे संख्या एकूण मृत्यू
आशियाई कामगार 200,000 +/- 80,000
ब्रिटीश POW`S 30,000 6,540
डच POW`S 18,000 +/- 2,830
कोरियाई/ जापानी सैनिक 15,000 1000
ऑस्ट्रेलिया POW`S 13,000 2,710
अमेरिकन POW`S 700 356
जवळपास प्रत्येक पाच कैद्यांपैकी एकाचा मृत्यू हा रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी. हा मार्ग बनवल्यानंतर 61,700 कामगारांना ट्रॅकच्या मेंटिनेन्ससाठी ठेवण्यात आले. त्यांना रेल्वे स्टेशनच्या आसपास राहण्यास सांगितले जाऊ लागले होते. युध्दावेळी झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक कामगार मारले गेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'डेथ रेल्वे'चे खास PHOTOS...