आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Different Animal Species Live In Harmony At Janice Wolf`S Rocky Ridge In Us

भिन्न प्रजातींच्या या प्राण्यांमध्ये अशीही अनोखी मैत्री, बघा LOVING MOMENTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रांमधील हे दृश्य कदाचितच तुम्हाला कुठे बघायला मिळेल. कारण या ठिकाणी 60पेक्षा अधिक प्रजातींचे प्राणी एकत्र प्रेमाने राहतात. हे चित्र बघायला मिळतंय अमेरिकेच्या अरकन्सास राज्याच्या रॉकी रिज रिफ्यूजमध्ये. येथे अनेक प्राणी, जीवमात्र एकत्र खातात-पितात, उठतात-बसतात आणि झोपतात.
या प्राण्यांच्या या अनोख्या रॉकी रिजच्या मागे एका महिलेचा हात आहे. त्या महिलेचे नाव जेनिका वोल्फ असून तिने यावर 20 वर्षे अतिशय कष्ट घेतले आहेत. ती एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन चालवते. जेनिका या संस्थेच्या माध्यमातून आजारी आणि कमजोर प्राण्यांचे पालन पोषण करते. तसेच या प्राण्यांवर उपचारदेखील करते. ती या सर्व प्राण्यांना एकत्र खाणे-पिणे आणि प्रेमाने राहण्यास शिकवते. अनेक लोक या संस्थेला देणगी देऊन प्राण्यांना दत्तक घेतात.
या प्राण्यांना एकत्र बघण्यासाठी बरेच लोक या रॉकी रिजला भेट देतात. संस्थेची वेबसाइट rockyridge.com आणि फेसबुकवर या प्राण्यांचे लव्हिंग मोमेंट्स दाखवणारी छायाचित्रे उपलब्ध आहेत .
एकत्र प्रेमाने राहणा-या या प्राण्यांचे काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...