आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर उतरले होते 37 वर्षांपूर्वी अचानक गायब झालेले विमान; वाचा..काय म्हणाले क्रू मेंबर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐतिहासिक पुस्तकांमध्ये अनेक रंजक घटना कैद झाल्या आहेत. या घटना कशा घडल्या, हे आजही कोणी सांगू शकलेले नाही. ज्यांनी कोणी या घटनेची माहिती दिली, त्यांनाही ठोस पुरावा अद्याप सादर करता आलेला नाही. पण, जगाच्या पाठीवर आजही अशा रहस्यमयी घटनांचा वारंवार उल्लेख केला जातो. आम्ही आपल्यासाठी घेऊन अशीच एक रहस्यमयी घटना घेऊन आलो आहे.

एअरपोर्टवर उतरले 37 वर्षांपूर्वी गायब झालेले विमान...
व्हेनुज्युएलाच्या काराकास (Caracas) शहरात 1992 मध्ये ही घटना घडली होती. एक चार्टर विमान (DC4- 57) प्रवाशांना घेऊन एअरपोर्टवर उतरले होते. विमान पाहून सर्व कर्मचार्‍यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण 37 वर्षांपूर्वी अचानक गायब झालेले हे विमान होते.

1955 मध्ये न्यूयॉर्कहून मायामीसाठी हे विमान रवाना झाले होते. परंतु ते अचानक रडारवरून गायब झाले होते. या घटनेचा पुरावा म्हणजे पायलेट आणि कंट्रोल रूमच्या अधिकार्‍यामध्ये झालेला संवाद.

कंट्रोल रूमच्या अधिकार्‍याने सांगितले होते की, 1955 चे एक कॅलेंडर विमानाच्या पायलटने उड्‍डान करताना रन वेवर सोडले होते. त्याने हे विमान पाहिले होते. इतकेच नाही तर पायलटचाही आवाज त्यांनी ऐकला होता. विशेष म्हणजे पायलटने सोडलेले कॅलेंडर अस्तित्वात असल्याचे त्याने सांगितले होते. परंतु या घटनेने कर्मचार्‍यांना चांगलाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

DC4- 57 विमान फ्लोरिडामध्ये उतरले असावे, असा अंदाज तेव्हा लावण्यात आला होता. इतर एअर ट्रॉफिक कर्मचार्‍यांनी सांगितले की, त्यांनी जे विमान पाहिले होते ते खूप जुने होते.

परंतु, उड्डान घेतल्यानंतर ते क्षणातच गायब झाले होते. घटनेबाबत कोणीही काहीही सांगू शकलेले नाहीत. काही जाणकार या घटनेला अलौकीक सांगतात. हे विमान टाइम लूपमध्ये अडकले असावे, असेही त्यांचे मत आहे...

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... या रहस्यमयी घटनेचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...