बिजींग- चीनमध्ये एका विषारी सापाला दारूच्या बॉटलमध्ये टाकून मारल्याचा व्हिडिओ सोशल साइट्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती एका कोब्रा सापाला तांदळापासून बनलेल्या दारूमध्ये टाकून बॉटल बंद करतात. यादरम्या साप निघण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला बाहेर येता येत नाही. काही वेळाने साप दारूच्या बॉटलमध्येच गुदमरून मरून जातो.
चीनमध्ये अशाप्रकारचे जिवंत साप दारूमध्ये टाकून स्नेक वाइन तयार करण्याची जूनी परंपरा आहे. तेथील लोक अशी दारु पिणे पसंत करतात. जिवंत साप दारूमध्ये मारण्याचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. जगभरात चीनला चित्र-विचित्र खाद्य खाण्यासाठी ओळखले जाते. तेथील लोक कुत्रा, मांजर, मगर अशाप्रकारचे प्राणी खाणे पसंत करतात.
सोशल साइटवर टिका-
सोशल साइट्सवर या व्हिडिओवर जोरदार टिका केली जात आहे. लोक असे करणा-या लोकांना शिक्षण देण्याची मागणीदेखील करत आहेत. मात्र अद्याप या दोन्ही व्यक्तींची ओळख पटू शकलेली नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा PHOTOS...