आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएनए संरचना लि‍हिलेल्या पत्राला मिळाले 29 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टर फ्रान्सिस क्रिक यांनी त्यांच्या मुलाला डीएनएची संरचना सांगण्यासाठी एक पत्र लिहिले होते. न्यूयॉर्कमधील क्रिस्टीज ऑक्शन हाऊसने या पत्राचा लिलाव केला. त्यात सुमारे 28.9 कोटी रुपये मिळाले. क्रिस्टीज यांच्या मते, आतापर्यंत लिलाव झालेल्या पत्रांमध्ये या पत्राला सर्वाधिक किंमत मिळाली आहे. यापूर्वी अमेरिकन राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच्या पत्राच्या लिलावातून सुमारे 18 कोटी रुपये मिळाले होते. क्रिक यांच्या वारसदारांनी वैज्ञानिक संशोधनासाठी हे पत्र जपून ठेवले होते.

ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट डॉ. क्रिक यांनी 19 मार्च 1953 मध्ये त्यांच्या 12 वर्षांच्या मुलासाठी सात पानांचे हे पत्र लिहिले होते. क्रिक यांनी जेम्स वॉटसन आणि मॉरिस विल्किन्स या मित्रांसोबत मिळून हे संशोधन केले होते. या तिन्ही वैज्ञानिकांना फिजिओलॉजी आणि वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी 1962 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.