आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे एफ-35 फायटर प्लेन उडवणारी अमेरिकेची पहिला महिला पायलट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी वायुसेनेत ले. कर्नल क्रिस्टाइन माऊ एफ-३५ फायटर प्लेन चालवणारी पहिली अमेरिकी महिला पायलट बनली आहे. पहिल्यांदा जेव्हा ती विमान उड्डाण केल्यानंतर इग्लिन एअरफोर्सच्या बेसवर परतली तेव्हा तिच्या विमानावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले. परंपरेनुसार याला बर्ड बाथ म्हटले जाते. सर्वात अाधुनिक फायटर प्लेन चालवणारी महिला म्हणून जगभरातील माध्यमात तिच्या नावाची चर्चा आहे.
ती म्हणते, ही कामगिरी माझ्यावर सोपवण्यात आल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. तिला विमान चालवताना आलेला अनुभव सांगताना सांगितले, माझी ही पहिली वेळ होती. जेव्हा कॉकपिटमध्ये माझ्यासोबत वेपन सिस्टिम अधिकारी नव्हता, ना इन्स्ट्रक्टर पायलटही नव्हता. फायटर पायलट म्हणून परफाॅर्मन्स दाखवत असताना, एक महिला म्हणून मला कोणती अडचण वाटली नाही. विमानाला काय माहिती असते की, ते चालवणारे महिला आहे की पुरुष. ग्राउंड फोर्सलाही तुमची गरज नसते. तुम्हाला केवळ कामगिरी बजावायची असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या महिला पायलटची छायाचित्रे...