(जर्मनीमध्ये धावणारी हँगिंग ट्रेन)
जर्मनीमध्ये एका रेल्वे ट्रॅकवर ट्रेन उलटी धावते. ही रेल्वे सेवा खप जूनी अलून त्याची सुरुवात 1901मध्ये झाली होती. जर्मनीच्या वुप्पर्टल परिसरात धावणा-या या ट्रेनमध्ये रोज जवळपास 82 हजार लोक प्रवास करतात. विशेष म्हणजे, पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी या ट्रेनची आतापर्यंत कुठेच नकल करण्यात आलेली नाहीये.
एका रिपोर्टनुसार, हँगिंग ट्रेन केवळ एकदाच गंभीर अपघाताची शिकार झालेली आहे. 1999मध्ये झालेल्या या अपघातात ट्रेन वुप्पर नदीमध्ये कोसळली होती. त्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू आणि 50 लोक जखमी झाले होते. शिवाय 2000 आणि 2013मध्येसुध्दा छोट्या-मोठ्या घटना घडल्या होत्या. परंतु त्यामध्ये कुणाचा मृत्यू झाला नव्हता. हँगिंग ट्रेनच्या ट्रॅकची लांबी 13.3 किलोमीटर इतकी असून हा ट्रॅक नदीपासून 39 फुट उंचावरून जातो. ट्रेन थांबण्यासाठी 20 स्टेशन बनवण्यात आले आहेत. ही ट्रेन विजेवर चालते.
का चालवली गेली हँगिंग ट्रेन-
ही ट्रेन हँगिग असण्याचे कारण म्हणजे, वुप्परल शहर 19व्या दशकाच्या शेवटी औद्योगिक विकासात खूप पुढे गेले होते. रस्ते तर होतेच, परंतु सामान वाहणा-या पायी चालणा-या लोकांसाठी होते. तिथे जमीनीवर चालवले जाणारे ट्राम चालवणे कठिण होते. डोंगराळ भाग असल्याने भुयारातूनसुध्दा रेल्वे चालवल्या जाऊ शकत नव्हत्या. या परिस्थिती काही इंजिनिअर्सनी हँगिंग ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. याला जगातील सर्वात जून्या मोनो रेल्वेंपैकी एक मानले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हँगिग ट्रेनचे PHOTOS...