आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do You Know Kokura Was The First Target For Atomic Bomb In Japan

PHOTOS: हे शहर अणुबॉम्ब हल्ल्यात झाले असते खाक, परंतु योगायोगाने वाचले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कोकुरा स्टेशनचा फोटो)
नवी दिल्ली- 9 ऑगस्ट 1945च्या सकाळी जापानचे नागासाकी शहर अणुबॉम्ब हल्ल्यात वाचू शकले असते. त्याऐवजी जापानमधील दुसरे शहर कोकुरा अणुबॉम्बमध्ये खाक झाले असते. ज्या दिवशी नागासाकीवर हल्ला झाला, त्या दिवशी अमेरिकेचे फाइटर बोइंग बी-29 सुपरफोट्रेस अणुबॉम्ब घेऊन कोकुराच्या जवळ पोहोचलेसुध्दा होते. विमान चालकांनी रडारने निश्चित केले, की बॉम्ब कुठे टाकायचे आहेत. परंतु असे होऊ शकले नाही.
वास्तवात नागासाकी बॉम्ब पाडण्यासाठी अमेरिकेचे पहिले टार्गेट नव्हते. अमेरिकेने कोकुराला पहिले लक्ष्य बनवले होते. परंतु अधिका-यांनी ठरवले होते, की बॉम्ब रडारने निश्चित करून बॉम्ब टाकायचे नाहीत, डोळ्यांनी तपासून निशाणा साधायचा. 9 ऑगस्टच्या सकाळी जेव्हा कोकुरावरून फाइटर विमान उडवत होते आणि काही वेळातच बॉम्ब टाकणारच होते, परंतु ढगाळ वातावरणामुळे ते शक्य झाले नाही. त्यादिवशी कोकुराच्या परिसरात ढगाळ वातावरण असल्याने बीइंग बी-29ला तिथून परत जावे लागले आणि जवळच असलेल्या नागासाकी शहरावर त्यांनी बॉम्ब टाकले.
किती मोठा हल्ला होता?
नागासाकीला उध्वस्त करणारा प्लूटोनिअम बॉम्ब होता. याने जवळपास एक लाख लोकांचा जीव घेतला. याला आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि शक्तीशाली बॉम्ब मानला जातो. याच्या तिन दिवसांपूर्वी हिरोशिमावर टाकण्यात आलेला यूरेनिअम बॉम्ब होता आणि यापेक्षा कमी शक्तीशाली होता. परंतु या सर्व हल्ल्यात कोकुरा शहर नशीबाने वाचले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोकुरा शहराचे काही PHOTOS...