नवी दिल्ली- आजच्या दिवशी अर्थातच 28 जुलै 1976मध्ये चीनमध्ये 8.3 तीव्रतेने भूकंप झाला होता. या भूकंपात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. राजधानी बिजींगच्या उत्तर-पूर्वमध्ये स्थित तांगशान शहर उध्वस्त झाले होते. शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळून जमीनीस मिळाली होती. त्यामध्ये जवळपास 2,000 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज होता. भूकंप इतका मोठा होता, की रस्ते, पूल, रेल्वे स्टेशन, घरे आणि कंपन्या उध्वस्त होऊन धूळीस मिळाल्या होत्या.
भूकंपानंतर चीनचे अधिकारी या संपूर्ण भूकंपाची माहिती देण्यास टाळटाळ करत होते. चीनव्दारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृत्यूची संख्या जुळपास दीड लाखांच्या घरात होती. तांगशान शहर पुन्हा वसले आहे. आज या शहराला 'चीनचे सर्वात धाडसी शहर' म्हणून ओळखले जाते.
नोट- यावर्षी नेपाळच्या काठमांडूमध्ये झालेल्या भीषण भूकंपात साडे आठ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. येथे सध्या शांतता असून पुनर्वसनाचे काम सुरु आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चीनच्या ३९ वर्षांपूर्वीच्या भूकंपाची छायाचित्रे...