आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालरुग्णांना हसवणारे डॉक्टर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्न (स्वित्झर्लंड) - डॉक्टर काका आणि औषधाचे नाव काढले की मुलांच्या अंगावर काटा उभा राहतो. मग आजारी पडल्यानंतर रुग्णालयात राहण्याची वेळ आल्यास मुलं घाबरतात. कोमेजतात. हे पाहून स्वित्झर्लंडमध्ये थिओदोरा फाउंडेशनमार्फत विदूषक डॉक्टर ही संकल्पना राबवण्यात येते.


हसवाफसवी:
रुग्णालयात असलेल्या मुलांना हसवण्याचे काम हे विदूषक डॉक्टर करतात. उचापती करणारे, खळाळून हसवणारे विदूषकाच्या वेशातील डॉक्टर काका पाहताच गंभीर आजारी मुलांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटते.

दोन भावांची कल्पना:
स्वित्झर्लंडचे पॉली बंधू आंद्रे आणि जेन यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ थिओदोरा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना सन 1993 मध्ये केली होती. या फाउंडेशनच्या वतीने देशभरात हा उपक्रम राबवला जातो. त्यांची विदूषकाची भूमिका अदा करणारे 30 डॉक्टर्स दर आठवड्याला 39 रुग्णालयांतील 55 हजार बालरुग्णांची भेट घेतात.

09 देशांमध्ये सध्या या संस्थेचे कार्य चालते. त्यामध्ये इंग्लंड, बेलारूस, चीन, स्पेन, फ्रान्स, इटली आणि तुर्कीचा समावेश आहे.

105 विदूषक डॉक्टरांनी या फाउंडेशनमार्फत समाजसेवेला वाहून घेतले आहे.

85 रुग्णालयांना हे डॉक्टर्स भेटी देतात.