आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मालकाने श्वानाला जिवंत पुरले, दूस-या श्वानाने वाचवला जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जिवंत पुरलेल्या श्वानाला दुसरा श्वान बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय.)
 
पेरिस- फ्रान्समध्ये एका युवकाने आपल्या पाळीव श्वानाला जिंवत गाडले, जेणेकरून त्याचा प्राण जावा. परंतु असे होऊ शकले नाही, कारण एका दुस-या श्वानाने आपल्या साथीदाराचे प्राण वाचवले. झाले असे, दुसरा श्वान आपल्या मालकाचा हात सोडून कच-याच्या मैदानाकडे धावला. तिथे त्याला एक जिवंत श्वान जमिनीत गाडलेला दिसला. तिथे पोहोचलेल्या दुस-या श्वानाच्या मालकाने तो श्वान जिंवत असल्याचे पाहिले. नंतर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
 
यादरम्यान त्या व्यक्तीने श्वानाला वाचवतानाचे फोटोसुध्दा काढले आणि फेसबुकवर शेअर केले. पाहता-पाहता श्वानाच्या समर्थनासाठी अनेक लोक समोर आले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आणि श्वानाच्या क्रूर मालकाला पकडले. मालकाला श्वाना जिवंत पुरण्याचे कारण विचारण्यात आले. मालकाने सांगितले श्वानाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त झाले होते आणि त्याला सांधिवातसुध्दा झाला होता. त्यामुळे मी मारण्यासाठी त्याला जिवंत पुरले. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अखेर कसे या श्वानाला दुस-या श्वानाचा वाचवला जीव...