Home »Khabrein Jara Hat Ke» Dolphin To Call For Visuals

एकमेकांना नावानुसार शिटी वाजवून बोलवतात डॉल्फिन

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 23, 2013, 12:31 PM IST

डॉल्फिन मोठय़ाने शिटी वाजवत एकमेकांना आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असतात. ही शिटी त्यांच्या नावानुसार असू शकते, असे मत ब्रिटनमधील सेंट अँड्रय़ूज युनिव्हर्सिटीचे मरिन बायोलॉजिस्ट स्टीफनी किंग यांनी व्यक्त केले आहे. डॉल्फिनला आवाजाची उत्कृष्ट प्रकारे नक्कल करता येते. ते संगणकातून निघालेल्या आवाजाचीही नक्कल करू शकतात. त्यामुळेच शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत आले आहेत की, डॉल्फिन परस्परांच्या ‘सिग्नेचर व्हिसल’ची नक्कल करू शकतात. अशा प्रकारच्या शेकडो शिट्यांच्या आवाजाचे अध्ययन केल्यानंतर शास्त्रज्ञ असा दावा करत आहेत की, शिटीच्या रूपात डॉल्फिन परस्परांचे नाव घेत असतात. अनेक प्राण्यांमध्ये एकमेकांचे नाव ठेवण्याची क्रिया शिकण्याची क्षमता नसते. माकडे खाण्यासाठी किंवा शत्रूने हल्ला केल्यासच आवाज काढतात, पण हा गुण माकडे शिकली नसून त्यांच्यामध्ये तो जन्मजात आहे. या नव्या अध्ययनात नाव ठेवण्याचे महत्त्व डॉल्फिनमध्ये आढळून आल्याचे म्हटले आहे.

शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की, डॉल्फिननी नावांनुसार शिटी वाजवणे सुमारे 50 वर्षांपूर्वी सुरू केले. संशोधकांनी केलेल्या अध्ययनानुसार तेव्हापासून डॉल्फिनचे पिलू आपल्या आईकडून शिटी वाजवायला शिकते. स्टीफनी सांगतात की, डॉल्फिनचा आवाज ओळखणे सोपे नाही. ते अनेकदा पाण्यात विशिष्ट परिस्थितीत आवाज काढतात.

अशा परिस्थितीत नेमका कोणता प्राणी आवाज काढत आहे, हे ओळखणे शास्त्रज्ञांसाठी कठीण आहे. या समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी स्टीफनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी डॉल्फिनच्या ‘सिग्नेचर व्हिसल’चे पाण्याच्या आतच रेकॉर्डिंग केले आहे. 1984 पासून 2009 पर्यंत शास्त्रज्ञांनी ‘सारासोटा डॉल्फिन रिसर्च प्रोग्राम’अंतर्गत प्लोरिडामधील सारासोटा खाडीवरील 250 डॉल्फिनच्या आवाजांचे रेकॉर्डिंग केले होते. त्यांनी चार डॉल्फिन शिटी वाजवताना हेरले होते. त्या वेळी त्यांच्या शारीरिक हालचालींचाही स्टीफन यांनी सूक्ष्मपणे अभ्यास केला आहे. B news.sciencemag.org

Next Article

Recommended