आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dramatic Moment Elderly Buffalo Refuses To Surrender With Lions

PHOTOS: एकाचवेळी 5 सिंहांनी केला म्हशीवर हल्ला, मात्र शिकार करू शकले नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग- सिंह कोणत्याच परिस्थितीत आपली शिकार सोडत नाही. ते आपल्या धारदार नखांनी मोठ-मोठ्या प्राण्यांचा जीव घेतो. मात्र अनेकदा याउलट घडते. सिंहाला आपल्या शिकारापुढे पराभव स्वीकारावा लागतो. अशीच एक घटना दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल रिझर्व्हजवळ स्थित लोंडोलिजि नॅशनर रिझर्व्ह पार्कमध्ये समोर आली.
एका म्हशीवर पाच सिंहानी हल्ला केला. त्यामधील एक सिंहीण म्हशीच्या अंगावर चढली आणि तिला पंजा मारू लागली. सिंहाने अचानक केलेल्या या हल्ल्याने म्हैस गुडघ्यावर खाली बसली. यादरम्यान दुस-या सिंहानेसुध्दा तिच्या हल्ला केला. एक वेळ अशी आली, की सिंह म्हशीची शिकार करतील असे वाटू लागले होते. मात्र म्हशीने तिथून धूम ठोकली.
या संपूर्ण घटनेचे छायाचित्रे लोंडोलिजि नॅशनल रिझर्व्ह पार्कमध्ये गाइड आणि ऑपरेटर म्हणून काम करणारे 30 वर्षीय बाईरोन सेराओने क्लिक केले आहेत. बायरोन सांगतो, 'मी यापूर्वी कधीच सिंहानी केलेला असा हल्ला पाहिला नाही. काही लोकांचे म्हणणे आहे, की सिंह रात्री शिकार करतो. परंतु या पाच भूकेल्या सिंहांनी अनेक पर्यटकांच्या उपस्थित म्हशीला शिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सिंहीणींची संख्या जास्त होती.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शिकारीचे काही PHOTOS....