कॅनडाचे प्रसिद्ध टीव्ही कॉमेडियन नॅथन फील्डर यांच्या विनोदी डोक्यातून निघालेल्या कल्पनेतून ‘स्टारबक्स’ची विडंबन शॉपी सुरू करण्यात आली. नॅथन हे ‘कॉमेडी सेंट्रल’चे प्रसिद्ध कलाकार आहेत.
स्टारबक्सचे स्पष्टीकरण
आम्ही विनोदाचे स्वागत करतो. या दुकानाशी आमचा काहीही संबंध नाही, परंतु आमचे नाव आणि लोगो ते वापरू शकत नाहीत, असे स्टारबक्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. ‘डम्ब स्टारबक्स’मधील कॉफी पिण्यायोग्य नसल्याचे सांगत प्रादेशिक अन्न निरीक्षकांनी हे दुकान बंद केले आहे.
चकटफू डम्ब स्टारबक्स
स्टारबक्स कॉफी आणि तीही चक्क फुकटात? हो, कॅलिफोर्नियात ‘स्टारबक्स’ची कॉफी आणि खाद्यपदार्थ अगदी फुकटात मिळत आहेत. दचकलात? लॉस एंजलिसच्या लॉसफेलिझ परिसरात अंतर्बाह्य हुबेहूब स्टारबक्ससारखेच दिसणारे, स्टारबक्सचीच हिरवी रंगसंगती आणि लोगो असणारे ‘स्टारबक्स’ नावाचे कॉफीशॉप उघडण्यात आले. फरक इतकाच की, स्टारबक्स नावापुढे ‘डम्ब’ हे नाव ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे. या शॉपमध्ये कॉफीसह सर्व पेये आणि खाद्यपदार्थ चक्क फुकटात दिले जात आहेत. हा फुकटचा ‘प्रसाद’ घेण्यासाठी लोकांनी डुप्लिकेट‘स्टारबक्स’ कॉफीसाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
कपभर कॉफीसाठी 2.5 तास प्रतीक्षा!
‘डम्ब स्टारबक्स’ने सर्व काही फुकटात देऊ केल्याने गर्दी वाढली. परिणामी एक कप कॉफीसाठी लोकांना अडीच तासांहून अधिक काळ तिष्ठत उभे राहावे लागले; पण ती फुकटात मिळाल्याने लोकांना त्याचेही काहीच वाटले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या डुप्लिकेट‘स्टारबक्स’ कॉफी शॉपची छायाचित्रे...