आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 18व्या वर्षी दिसते 144 वर्षांची, \'पा\'मधील आजाराने ग्रस्त आहे ही मुलगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीला- वरील छायाचित्र जरा लक्ष देऊन पाहा. तुम्हाला दिसले असेल, की या दोघांचे वय खूप जास्त आहे, परंतु असे नाहीये. फोटोमध्ये दिसणारी मुलगी प्रोजेरिया नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजारामुळे वयाच्या केवळ 18व्या वर्षीच तिची बॉडी 144 वर्षांच्या वृध्द महिलेसारखी दिसते. या आजाराने ग्रस्त झालेली मुले सामान्य मुलांपेक्षा 8 ते 10 पटीने जास्त वृध्द दिसतात. फिलिपीन्सच्या मनीलाची रहिवासी या तरुणीचे नाव अना रोचेला पोन्डेअर आहे.
प्रोजेरियाच्या उपचारासाठी अनावरती अनेक मेडिकल चाचण्या झाल्या आहेत. अशाच एक मेडिकल चाचणीसाठी ती बोस्टनला गेली होती. तिथे ती दुस-या प्रोजेरियाने ग्रस्त असलेल्या 8 वर्षांच्या रुग्णाला भेटलीय या आजाराने संपूर्ण जगात जवळपास 80 लोक ग्रस्त आहेत. अमिताभ बच्चन अभिनीत 'पा' सिनेमातसुध्दा याच आजारावर भाष्य करण्यात आले होते. त्यामध्ये अमिताभ यांना याच आजाराने पिडीत दाखवण्यात आले होते. सांगितले जाते, की प्रोजेरिया आजाराने पिडील लोक जास्तित जास्त 14 ते 20 वर्षेच जगतात.
भारतातसुध्दा समोर आली आहे अशी घटना-
बिहारचा रहिवासी अली हुसैनसुध्दा प्रोजेरिया आजाराने पिडीत आहे. त्याच्या दोन भाऊ आणि तीन बहिणींचा याच आजाराने मृत्यू झाला होता. प्रोजेरिया आजाराने त्रस्त असलेल्या मुलांचे शरीर एखाद्या वृध्दासारखे दिसते. या आजाराने डोळ्यांच्या आजाराची समस्या निर्माण होते. तसेच हृदयरोग, सांधेदुखी आणि टक्कल पडणे यांसारख्या समस्या उद्भवतात. यामागे अनुवांशिकतेचे कारण असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, प्रोजेरियाने ग्रस्त असलेल्या मुलीचे फोटो...