आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • El Caminito Del Rey The Most Dangerous Walkway In The World

जगातील खडतर आणि धोकादायक फुटपाथ, प्रत्येक पावलावर येतो मृत्यूचा अनुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आसपास किंवा आपण सोशल मीडिया आपल्याला अनेक वेगळ्या रचनेचे रस्ते दिसतात. या रस्त्यांकडे पाहून कधी-कधी आपल्यालाच भिती वाटते इतके ते भयावह असतात. असाच एक रस्ता स्पेनमध्येदेखील आहे. एल कॅमिनॅटो डेल रे खडकाच्या बाजूने जाणारा हा रस्तादेखील तितकाच भयावह आहे. या मोठ्या खडकावर चढण्याचा अनेकांना खूप शौक आहे, असे लोक वर्षभर येथे भेट देत असतात.
काहीजण येथे चढण्याचे प्रशिक्षणसुध्दा घेतात. सुरुवातीला या रस्त्याच्या काही भागातून जेणे खूप धोकादायक होते. परंतु येथे लाकडाच्या आणि लोखंडाच्या सहाय्याने एक रस्ता बनवण्यात आला. हा रस्ता सुंदर तर आहेत, याची रचना अनेकांना आकर्षित करते. आता लोक येथून आरामात जाऊ शकतात. मात्र उंच असल्याने रस्त्यावरून चालणे गरगरल्यासारखे वाटते. येथे येणा-यांची मोठी संख्य असते, दरवर्षी जवळपास 600 तिकीट बुक होतात. लोकांना या रस्त्याची सैर करणे रंजक वाटते.
हा रस्ता बांधल्यानंतर पर्यटकांना चार मैलचे अंतर पायी कापाणे थोडे सोपे झाले आहे. तसेच आठवड्यातून केवळ सहा दिवसच चालू असतो. अॅडव्हेंचरचे शौकीन असलेले लोक येथे अवश्य भेट देतात. तसेच जोखिम पत्कारून रॉकक्लाइंबिंगसुध्दा करतात. रस्त्याचे जमिनीपासून खूप अंतर असल्याने काहींना येथे जाण्यास भितीही वाटते, मात्र या रस्त्यावरून चालणे एक अविस्मरणीय अनुभव आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या धोकादायक रस्त्याची खास छायाचित्रे...