आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिलेव्हरीनंतर तासाभरात चिमुरडीचा मृत्यू, आई वडिलांनी केले Photoshoot, वाचा कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडममध्ये आपल्या मुलीबरोबर फोटोशूट करणे या कपलला त्रासदायक ठरले आहे. कारण त्यामुळे त्यांना लोकांचे खरे खोटे ऐकावे लागत आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या मृत मुलीच्या पार्थिवाबरोबर हे फोटोशूट केले. डर्बी रॉयल हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या सिडनीचा जन्मानंतर तासाभरातच मृत्यू झाला. ही चिमुरडी अॅडवर्ड सिंड्रोम आजाराने ग्रस्त होती.

आम्हाला आठवणी जपायच्या आहेत..
सिडनीची आई हेले राइस सांगते की, हे फोटो सिडनीच्या जन्माच्या दोन दिवसांनी घेण्यात आले आहेत. काही लोकांना मात्र हे खटकत आहे. त्यांच्या मते आम्ही आमच्या दिवंगत मुलीची खिल्ली उडवत आहोत. पण ज्यांनी स्वतःची मुले गमावली आहेत, त्यांना आमचे दुःख समजू शकते. कारण आमच्याकडे आता तिच्या आठवणींशिवाय इतर काहीही शिल्लक राहिलेले नाही. हे फोटो पाहूनच आम्ही तिची आठवण ठेवू. या फोटमध्ये सिडनी तिचे आईवडिल आणि दोन बहिणींबरोबर दिसत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सिडनीचे इतर काही PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...