आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ever Thought Of A Goat That Feasts On Chicken And Fish.

चिकन आणि मासे फस्त करणारी अफलातून बकरी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलप्पुरम् (केरळ)- 'तुम्ही कधी मांसाहार करणारी बकरी पाहिली आहे का?' असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल. कारण बकरी ही शाकाहारी प्राणी आहे. परंतु केरळमध्ये मांसाहारी बकरी अवतरली आहे. कोंबडीच्या मटनासह ती मासे फस्त करते. तुमचा यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे.

नुरूंगल येथील रहिवासी शकीर याने गेल्या सहा महिन्यांपूर्वी एक बकरी खरेदी केली होती. अन्य बकर्‍यांप्रमाणे आपल्याकडे असलेली बकरी चारा खात नाही. तर ती मांसाहार करते, असा दावा शकीर याने केला आहे.

कोंबडीचे मटन आणि मासे हाच या बकरीचा दररोजचा आहार आहे. घरासमोरून जाणार्‍या कोंबड्यांची ही बकरी शिकार करते. तसेच चरण्यासाठी गेल्यानंतर ही बकरी नदी, नाल्यातील मासे खाते.

गावातील कोंबड्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या. साप अथवा मंगूस कोंबड्या फस्त करीत असल्याचा संशय गावकर्‍यांना होता. परंतु हे कारस्थान शकीर याच्या बकरीचे होते.

गेल्या सहा महिन्यात या बकरीने 50 पेक्षा जास्त कोंबड्या फस्त केल्याचे शकीर याने सांगितले. मांसाहार करणार्‍या आपल्या बकरीला काही त्रास तर होत नाही ना, याची खात्री करण्‍यासाठी त्याने तिला पशुवैद्यकीय रुग्णालयातही दाखविले. बकरीच्या रक्ताचे नमुने परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.