बीजिंग (चीन)- चीनमधील गुआंगडोंग प्रांतातील वर्कर्स दुपारी जेवण घेतल्यावर अर्धा तास वामकुक्षी घेतात. पण कुणाचा डोळा चुकवून किंवा कामचुकारपणा करण्यासाठी ते असे करीत नाही. येथील स्थानिक प्रशासनाने त्यांना अशी सुट दिली आहे. तीही सर्वच कामगारांना.
झोपण्यासाठी पलंगांची सोय नसली तरी
आपल्या सोईप्रमाणे आराम करण्यास प्रशासनाने सांगितले आहे. यामुळे वर्कर्स कामाच्या खुर्चीवरच वामकुक्षी घेतात. यामुळे फॅक्टरींचे प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे. कामात तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे फॅक्टरी मालकांनी सांगितले आहे.
यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले, की सातत्याने काम करीत असताना वर्कर्स थकून जातात. यामुळे आम्ही विचार केला, की त्यांना अर्धा तास आराम करण्याची संधी दिली तर त्यांची कार्यकुशलता निश्चितच वाढेल. त्यामुळे हा नियम करण्यात आला. यामुळे कामात सुक्षारणा झाली असून वर्कर्सही खुश आहे.
पुढील स्लाईडवर बघा, फॅक्टरीत झोपलेल्या कामगारांचा आणि कंपनीचा फोटो...