आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोग्राफरने दाखवली या भटक्या जमातीची LIFE, खातात कच्चे मांस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरणाला मारून त्याचे कच्चे मांस खाताना नेनेट्स आदिवासी लोक... - Divya Marathi
हरणाला मारून त्याचे कच्चे मांस खाताना नेनेट्स आदिवासी लोक...
मॉस्को: रशिअन फोटोग्राफर दमित्री तकाचुकने रशिया नाडिम क्षेत्रात राहणा-या नेनेट्स आदिवासींचे फोटो क्लिक केले आहेत. तो जवळपास 1 महिना या लोकांमध्ये राहिला आणि -34 डिग्री तापमानात या जमातीचे फोटो क्लिक करून त्यांचे आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न केला.
खातात कच्चे मांस, महिला करतात जास्त काम...
फोटोग्राफर दमित्रीने सांगितले, की या जमातीच्या लोकांचे आयुष्य रेनडिअर (हरणाची प्रजाती) या प्राण्यावर अवलंबून आहे. ते या प्राण्याची शिकार करतात आणि कच्चे मास खातात. शिवाय त्यांचे मांस एका फॅक्ट्रीमध्ये विकून इतर गरजा पूर्ण करतात. ही फॅक्ट्री यूरोपियन देशात रेनडिअरच्या मांसाचा सप्लाय करते. या क्षेत्रात रेनडिअरची संख्या खूप जास्त आहे.
फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार, या जमातीच्या महिला सर्वाधिक काम करतात. त्या सर्वात जास्त कष्टाळू आहेत. मुलांचे संगोपन करण्याशिवाय घरातील सदस्यांसाठी जेवण बनवणे, तंबू लावणे आणि काढण्याचे, जाळण्यासाठी वाळलेली लाकडे कापणे आणि परिधान करण्यासाठी कपडे शिवणे, इत्यादी कामे या महिला करतात.
या जमातीत आहेत 40 हजार लोक...
दमित्रीने सांगितले, की या जमातीचे लोक भटके असतात. जे वेळोवेळी आपले ठिकाण बदलतात. पूर्वी हे लोक ओबच्या खाडीकडे राहत होते. परंतु आता यार साले आणि यमन पेनिन्सुलामध्ये राहतात. यांची लोकसंख्या जवळपास 40 हजार आहे. मी त्यांच्या दैनंदिन आयुष्य दाखवण्यासाठी स्वत:ला त्यांच्यासारखे केले होते. त्यांच्यासारखेच अंघोळ न करता अनेक दिवस राहायचो आणि त्यांच्यासारखे कपडे परिधान करायचो. इतकेच नव्हे, रेनडिअरचे मांससुध्दा खाल्ले. मी ते सर्व केले, जे ही जमात करत होती.
हरणाच्या कातड्यापासून बनलेले पलंग...
दमित्रीने सांगितले, की हो लोक खूप कठिण परिस्थिती आयुष्य जगतात. मात्र, त्यांना बालपणीपासूनच असे आयुष्य जगण्याची सवय लागते. यांच्या पलंगावर हरणाचे कातडे अंथरलेले असतात. यामुळे थंडी वाजत नाही. दमित्रीच्या सांगण्यानुसार, या जमातीच्या काही लोकांकडे जनरेटरसुध्दा आहे. याचा वापर ते संध्याकाळी सिनेमे पाहण्यासाठी करतात. तसेच, काही लोक स्नोमोबाईलचासुद्धा वापर करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटोग्राफरने क्लिक केलेल्या या जमातीचे आयुष्य...
बातम्या आणखी आहेत...