न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वॉयर बिल्डिंगवर विवस्त्र होऊन चढलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता पसरवण्याची तक्रार दाखल केली आहे. 21 वर्षीय आरोपी क्रित मॅक्लिन सकाळी 8 वाजता बिल्डिंगवर चढला आणि जोरात ओरडू लागला. लोकांनी सांगितले, 'ती व्यक्ती म्हणत होते, डोनाल्ड ट्रम्प तू कुठे आहेस? डोनाल्ड ट्रम्पला त्याने शिवीगाळसुद्धा केली.' त्याला नियंत्रात आणण्यासाठी पोलिसांना एक तास कसरत करावी लागली.
म्हणाला, 'मी व्हर्जिन आहे...'
अचानक उंच बिल्डिंगवरून एका विवस्त्र व्यक्तीचा आवाज ऐकायला आला, उपस्थित लोक त्याला पाहून अचंबित झाले. या व्यक्तीवर पोलिसांनी अव्यवस्था पसरवल्याचासुध्दा आरोप लावला आहे. ही व्यक्ती फॅशन मॉडेल आहे. तो कोलंबिया यूनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे.
हात तुटला, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले...
त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी काहीवेळ लोकांना तेथे ये-जा करण्यास मनाई केली. आरोपी ओरडताना म्हणत होता, की 'मी व्हर्जिन आहे.' त्याने पोलिसांवरसुद्धा निशाणा साधला. त्यानंतर त्याने बिल्डिंगच्या छतावरून दुस-या प्लॅटफॉर्मवर उडी मारली. त्याचा हात तुटला आणि हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. या प्रकरणात त्याला 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 33 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे PHOTOS...