आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉगीतही वाढला लठ्ठपणा, व्यायाम आणि शस्त्रक्रियेनंतर घटवले वजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ओबी नावाचे श्वानाने कमी केले 10 किलो वजन)
एखादा श्वान मनुष्याप्रमाणे वजन कमी करते या गोष्टीवर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. अशीच एक गोष्ट ओरेगनच्या पोर्टलँडमध्ये समोर आली आहे. येथे शस्त्रक्रिया, व्यायाम, खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेऊन एका श्वानाने तीन महिन्यात 10 किलो वनज कमी केले आहे. आता हा डॉगी सामान्य श्वानांप्रमाणे फिट आहे. या डॉगीचे नाव ओबी आहे.
सांगितले जाते, की याचे वजन 2012मध्ये 35 किलो होते. याचे पोटसुध्दा खूप सुटले होते. त्याला आपल्या वाढत्या वजनाने चालण्यास खूप त्रास व्हायचा. त्याच्या वजनाने त्याचा मृत्यू होणाच्यासुध्दा शक्यता होती. 2012मध्ये एका वेटनरी टेक्नीशिअन नोरा वनाचाने या श्वानाला दत्तक घेतले आणि त्याचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. नोरा वनाटाने या डॉगीसाठी वेबसाइटसुध्दा तयार केली आणि लोकांना ओबीच्या तब्येतीसाठी पैसे जमा केले. मिळालेल्या पैशात वनाटाने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि त्याच्या खाण्याची सोय केली. वनाटाच्या या प्रयत्नांना यश आले आणि डॉगीचे वजन कमी झाले.
मात्र, हे करणे इतके सोपेदेखील नव्हते. त्यासाठी नोराने डायटींगसोबतच ओबीला व्यायामसुध्दा सुरु केला. त्यातून जास्त फायदा दिसून येत नव्हता म्हणून त्याने ओबीवर शस्त्रक्रिया केली. आता ओबीचे वजन कमी झाले असून तो फिटसुध्दा झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शस्त्रक्रियेपूर्वी कसा दिसत होता ओबी...