आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women In China Undergo Brutal Bodyguard Training

VIDEO : बॉडीगार्ड बनण्यासाठी चीनमध्ये तरुणींना दिले जाते असे कठोर ट्रेनिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील वेगवेगळ्या देशांत आर्मीत दाखल झालेल्या लोकांना कठोर प्रशिक्षण दिले जाते. शत्रूसोबत मुकाबला करताना हे लोक मागे पडू नयेत, हा त्यामागील उद्देश असतो. भारतात आपण असे कठोर प्रशिक्षण घेणा-या मोजक्याच तरुणी पाहिल्या असतील. मात्र याउलट चित्र चीनमध्ये आहे. येथील तरुणी मोठ्या संख्येने आर्मीतच नव्हे तर बॉडीगार्ड होण्यास इच्छूक असतात.
बॉडीगार्ड होण्यासाठी कठोर आणि अवघड ट्रेनिंग देणा-या अनेक संस्था चीनमध्ये सुरु झाल्या आहेत. या संस्थांमध्ये तरुणींना आठ ते दहा महिन्यांचे कठीण प्रशिक्षण दिले जाते. चीनमध्ये कोट्यधीश महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या श्रीमंत महिला बॉडीगार्ड म्हणून स्त्रियांचीच नियुक्ती करण्यास पसंती देतात. त्यामुळे येथील तरुणी बॉडीगार्डचे ट्रेनिंग घेण्यास इच्छूक असतात.
दिले जाते अवघड आणि कठोण ट्रेनिंग
या तरुणींना दिले जाणारे प्रशिक्षण कसे असते, हे जाणून तुम्ही अचंबित व्हाल. वरील व्हिडिओ बघून तुम्हाला काहीसा अंदाज आलाच असेल. हे चित्र चीनमध्ये बॉडीगार्ड्स होण्यास इच्छूक असलेल्या तरुणींचे आहे. या प्रशिक्षणात तरुणींच्या डोक्यावर काचेच्या बॉटल फोडल्या जातात, तसेच चिखलातून झोपून वेगाने चालण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तरुणींना बळकट बनवण्यासाठी एका व्यक्तीला त्यांच्या अंगावरून चालवले जाते. हे अवघड ट्रेनिंग घेऊन तरुणी तरुणांप्रमाणेच बॉडीगार्डची जबाबदारी योग्यरित्या पेलू शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कसा खडतर प्रवास करून या तरुणी होतात बॉडीगार्ड्स...