आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Female Genital Mutilation Is Still In Practice In African And Middle Eastern Countries

या 29 देशांत आजही होतो महिलांचा खतना, जाणून घ्या कुप्रथा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रिकेच्या जाम्बियाने देशात महिलांच्या खतन्यावर बंदी घालण्यात आली आहे. या देशाच्या इन्फॉर्मेशन मिनिस्ट्रीने दोन दिवसांपूर्वी सरकारच्या या निर्णयाची पुष्टी केली आहे. मंत्रालयाच्या भूमिकेनुसर, राष्ट्रपती याहया जामेह यांनी सांगितले, की खतन्यासाठी ना इस्लाममध्ये जागा आहे ना देशातील मॉडर्न सोसायटीमध्ये. अँटी-एफजीएम (खतना) अॅक्टिव्हिस्ट बरहेन रासवर्कने याला सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले, की हा स्वयंसेवी संस्था आणि महिला कार्यकर्त्यांव्दारा एफजीएमच्या विरोधात 30 वर्षांपासून केल्या जाणा-या संघर्षाचे हे फळ आहे.
जाम्बिया आता त्या 20 आफ्रिका देशांत सामील झाला आहे, ज्यामध्ये एफजीएमवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र जगात आजही असे 30 देश आहेत, जिथे लहान मुले आणि महिलांसाठी खतनासारख्या विचित्र परंपरा आहेत. विशेषत: आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांत या परंपरा सामान्य आहेत. या देशांत परंपरा आहे, की मुलींना लग्नासाठी तयार करण्यासाठी क्लिटोरिस कापणे गरजेचे असते. त्यानंतर महिलांमध्ये जेनेटाइल मालफॉर्मेशनसह आरोग्याशी निगडीत अनेक गोष्टींचा त्रास दूर होतो, असे समजले जाते
पुढे जाणून घ्या अशाच काही देशांविषयी, जिथे महिलांचा खतना होतो...
इजिप्त-
इजिप्तमध्ये या प्रक्रियेतून जाणा-या मुली आणि महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. वयाच्या 9 ते 12 व्या वर्षीच मुलींचा खतना केला जातो. इजिप्त सरकारकडून मे महिन्यात सादर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, येथे 92 टक्के विवाहित महिला खतनाच्या प्रक्रियेतून गेल्या आहेत. 2000 मध्ये हा आकडा 97 टक्के होता. यूएनच्या आकड्यांनुसार, या प्रक्रियेतून जाणा-या सर्वात महिला इजिप्तच्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच देशांविषयी जिथे आजही खतनासारखी परंपरा आहे...
बातम्या आणखी आहेत...