आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Suicide Bomber And Other Facts Of Suicide Bombing

जगातील पहिल्या आत्मघातकी बॉम्बरने घेतला होता राज्यकर्त्याचा जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगात दहशतवादावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. फ्रान्स आणि अमेरिकेने आयएसआयएसवर हल्ले तीव्र केले आहे. फ्रान्समध्‍ये एका महिला आत्मघाती बॉम्बरचे प्रकरण समोर आले आहे. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला आत्मघाती बॉम्बिंग केव्हा आणि कधी सुरु झाले याविषयी सांगणार आहोत.
जगातील पहिला आत्मघाती हल्लेखोर इग्नेटी ग्रिनवित्सकी याची इतिहासात नोंद आहे. 13 मार्च 1881 मध्‍ये ग्रिनवित्सकीने रशियाच्या सेंट पिटर्सबर्ग येथील विंटर पॅलेसबाहेर अलेक्झांडर द्वितीयाच्या लवाजमावर बॉम्बने हल्ला केला होता. रशियन शासकावर हा हल्ला खूप नियोजनबध्दतेने केला गेला होता.
बुलेट प्रूफ गाडीत बसले होते :
वास्तविक, अलेक्झांडर आपल्या ताफ्यात बुलेट प्रूफ गाडीत बसले होते. या दरम्यान आत्मघाती बॉम्बरच्या एका सहकार्याने एक छोटेसे स्फोट घडवून आणले. यानंतर अलेक्झांडर बुलेट प्रूफ गाडीच्या बाहेर निघाले. ग्रिनवित्सकीने आपला शिकार पाहिला आणि अलेक्झांडरच्या पायाजवळ बॉम्ब फेकून स्फोट घडवून आणला. यात काही तासांत रशियाचा शासक मारला गेला. हल्लेखोरीही यात मारला गेला.
हल्ल्यापूर्वी आत्मघाती बॉम्बरने काय लिहिले होते?
हल्ल्यापूर्वी ग्रिनवित्सकीने लिहिले, मला वाटते, की माझी ड्यूटी ही मृत्यू असेल. माझ्याकडून कोणीही अधिक मागू शकणार नाही. एका वृत्तानुसार, गेल्या 30 वर्षांमध्‍ये 36 देशांमध्‍ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 30 हजारापेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे.
जगातील काही मोठे आत्मघाती हल्ले :
> अल काईदाने 11 सप्टेंबर 2001 मध्‍ये वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर हल्ला केला होता. यात 3 हजार लोकांचा मृत्यू झाला.
>हिजबुल्लाने 23 ऑक्टोबर 1993 मध्‍ये लेबनॉनमध्‍ये अमेरिका आणि फ्रान्सच्या लष्‍करी ठिकाणांवर हल्ला केला. यात 320 जणांचा मृत्यू झाला.
>अल काइदाने 14 ऑगस्ट 1987 मध्‍ये इराकमधील याजिदी संप्रदायावर हल्ला. यात 500 लोकांचा मृत्यू झाला होता.
> 7 ऑगस्ट 1998 रोजी अल काईदाने केनिया आणि टांझानिया येथील अमेरिकन दूतावासांवर हल्ला केला होता. यात 224 जणांचा मृत्यू झाला.
> 12 ऑक्टोबर 2002 मध्‍ये जिमाह इस्लामियाने इंडोनेशियातील बालीत हल्ला केला. यात 202 लोकांचा मृत्यू झाला.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या आत्मघाती हल्ल्याशी संबंधित आणखी फॅक्ट्स...