आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Day Old Hippopotamus Calf Mauled To Death In South Africa

PHOTOS: दोन पाणघोड्यांच्या भांडणात तिस-याने गमावला जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दोन मोठ्या पाणघोड्यांच्या भांडणात अडकलेला छोटा पाणघोडा)
दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात दोन प्राण्यांच्या भांडणात तिसरा प्राणी वाईटरित्या अडकला आणि त्याचा मृत्यू झाला. झाले असे, की आफ्रिकेच्या सिमांगलिसो वेटलँट पार्कमध्ये दोन पाणघोड्यांमध्ये भांडण चालू होते. तेव्हा एका पाणघोड्याचे पिल्लू तिथे आले. दोघांमध्ये जोरदार भांडण चालू असताना त्या त्यातील एका पाणघोड्याने त्या पिल्लाला उचलून हवेत फेकले. त्यानंतर एका पाणघोड्याने त्याच्यावर दाताने हल्ला केला.
या पाण्याघोड्याच्या पिल्लाचे वय 5 वर्षे होते. त्यावेळीच एक मादी पाणघोडी दूर उभा राहून केवळ पाहत होती. परंतु तिने नंतर या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा खूप उशीर झालेला होता. दोन पाणघोड्याच्या भांडणात पाच वर्षांचे पिल्लू काही क्षणांत मरण पावले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दोन पाणघोड्यांच्या भांडणाची थरारक छायाचित्रे...