आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 वर्षांत बदलले खूप काही, मात्र नाही बदलला या पाच मित्रांचा पोझ देण्याचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगामध्ये मैत्रीच्या अनेक अनोख्या कहाण्या समोर आल्या आहेत. असेही काही मित्र असतात जे बालपणापासून ते वृध्दावस्थेतपर्यंत आपली मैत्री टिकवून ठेवतात. वरील छायाचित्रातील हे पाच मित्र जे हायस्कुलच्या दिवसांपासून ते आतापर्यंत एकाच ठिकणी फोटो काढतात तेही एकाच पोझमध्ये.
हे सर्व 1982मध्ये कॅलिफोर्नियाच्या कोप्को झीलच्या भ्रमंतीसाठी गेले होते. तिथे डिक्सनने डेक केबिनच्या 35 एमएमच्या सेल्फ टाइमरच्या कॅमे-यात हा फोटो क्लिक केला होता. त्यानंतर प्रत्येक पाच वर्षांच्या अंतरावर त्यांनी त्याच ठिकाणी एकसारखे पोझ देऊन आपल्या मैत्रीचे झेंडे रोवले. 2012पर्यंत ते आपल्या मैत्रीच्या आठवणींना ताजेपणा देत राहिले. इमगुर, इंस्टग्राम, फेसबुक सारख्या सोशल साइट्सवर त्यांनी आपली अशी अनोखी मैत्री दर्शवली आहे.
या पाचही मित्राच्या एकच पोझ सर्व फोटोमध्ये तुम्हाला दिसतील. परंतु हे फोटो वेगवेगळ्या वेळी काढलेले आहेत.
ही अनोखी मैत्री बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...