आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातील 6 महिने असतो सुट्टयांवर, असे धमाल आयुष्‍य जगतो हा व्‍यक्‍ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोजीरोटीसाठी सर्वांनाच काम करावे लागते. मात्र आज आम्‍ही तुम्‍हाला अशा व्‍यक्‍तीविषयी सांगणार आहोत जो अर्धे वर्ष काम करतो आणि उर्वरित वर्ष केवळ फिरतो. अमेरिकेत राहणा-या या 35 वर्षीय व्‍यक्‍तीने आतापर्यंत आपले नाव सांगितलेले नाही. त्‍यांचे म्‍हणणे आहे की, रोज कामावर जाण्‍याचा त्‍यांना फार कंटाळा येतो. 
 
असे जगतो आयुष्‍य 
वर्षातील सहा महिने अमेरिकेतील कनेक्टिकटमध्‍ये वडीलांच्‍या बोटवर ते मासे पकडण्‍याचे काम करतात. उर्वरित 6 महिने आपल्‍या सायकलवर ते जग फिरतात. त्‍यांचे म्‍हणणे आहे की, 'प्रवासासाठी जास्‍त पैसे लागत नाहीत.' सुट्टयांमध्‍ये प्रवासादरम्‍यान दररोज ते केवळ 650 रुपये ऐवढा खर्च करतात. दररोज सकाळी 9 ते संध्‍याकाळी 5 वाजेपर्यंत काम करणे आपल्‍याला अजिबात आवडत नाही, असे ते सांगतात. आयुष्‍यातील चांगले दिवस ते फिरण्‍यामध्‍ये व्‍यतीत करु इच्छितात. यासाठी त्‍यांना केवळ एक सायकल आणि काही आवश्‍यक गोष्‍टी हव्‍या असतात. 

काम त्‍यांच्‍या जीवनाचा भाग नाही 
ते सांगतात की, 'काम करणे आयुष्‍याचा भाग होऊ शकत नाही, हे फार पूर्वीच मला कळाले होते. त्‍यामुळे अर्धे वर्ष काम करुन साडे सहा लाख रुपये कमावतो. नंतर त्‍याच पैशात उर्वरित सहा महिने जग पाहण्‍यासाठी मी बाहेर पडतो.' 

सोशल मिडीयावर स्‍टार 
त्‍यांचे सोशल मिडीयावर  ultraromance नावाचे अकांऊटही आहे. यामध्‍ये ते आपल्‍या प्रवासाचे फोटोज शेअर करत असतात. त्‍यांचे इन्‍स्‍टाग्रामवर 92 हजार फॉलोअर्स आहेत. 

एका ठिकाणावर 6 महिन्‍यांपेक्षा जास्‍त वेेेळ थांबत नाही 
ते सांगतात की, 'बाहेर गेल्‍यावर मी जंक फुड खात नाही. त्‍याचा खर्चही फार होतो. त्‍याऐवजी मी नैसर्गिक आहारावर लक्ष देतो.'    मागील 15 वर्षांत ते कोणत्‍याही एका ठिकाणी 6 महिन्‍यांपेक्षा अधिक काळ थांबलेले नाहीत. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, त्‍यांचे फोटोज... 

 
 
बातम्या आणखी आहेत...