आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreigner Captured Indian Elephant Beaten Into Submission At Secret Camps

भारतात हत्तीला दिल्या जातात अशा वेदना, विदेशी पत्रकाराने कैद केले PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(केरळमध्ये परदेशी पत्रकार (इन्सेटमध्ये)ने क्लिक केलेला फोटो)
नवी दिल्ली- पर्यटकांना दाखवण्यासाठी हत्तीसोबत क्रूर व्यवहार केला जातो. एका ठिकाणी हत्तीला वर्षानु वर्षे बांधून ठेवतात. असे परदेशी पत्रकार लिज जोन्सचे म्हणणे आहे. तिने केरळचा दौर करून तेथे वाईट परिस्थित राहणा-या हत्तीचे फोटो कैद केले आहेत. लिज जोन्सने पूर्ण स्थिती व्यक्त करताना सांगितले, 'मला नाही वाटत, हे हत्ती चांगले जगत आहेत की सुखी आहेत.'
तिने दाखवले, की हत्तीला लोखंडाच्या काठीने मारले जाते आणि साखळदंडाने बाधले जाते. हत्तीला मंदिरात आणण्यापूर्वी सीक्रेट ट्रेनिंग कॅम्पमध्येसुध्दा टॉर्च केले जाते. लिजने हत्तीच्या स्वातंत्र्यासाठी अपील केले आहे.
लिजच्या सांगण्यानुसार, हत्ती एखाद्या मुर्तीप्रमाणे दिसतात, जसे त्यांना एखाद्या म्यूझिअममध्ये ठेवण्यात आले आहे. तिने सांगितले, की एका हत्तीच्या मागच्या आणि पुढच्या पायाला अशाप्रकारे बांधण्यात आले होते, की तो झोपूदेखील शकत नव्हता. त्याला जवळ ठेवण्यात आलेले पाणीसुध्दा पिता येत नव्हते. एका दुस-या हत्तीचा पाय तुटल्यानंतर तो 20 वर्षांपासून एकाच ठिकाणी पडून आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, लिजचे क्लिक झालेले PHOTOS...