फ्रांसमधील एका महिलेने मृत प्रियकराशी विवाह करण्याची कायदेशीर लढाई जिंकली आहे आणि आता ती मृत प्रियकरासोबत लग्न करणार आहे. दोन वर्षापासून प्रियकरांच्या मृत्यूच्या दु:खत असणा-या या महिलेला 20 महिन्यानंतर तिचा अधिकार मिळाला आहे. फ्रांसचे राष्ट्रपती फ्रांसुआ ओलाद यांनी या महिलेला तिची ही विचित्र इच्छा पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे.
फ्रांसच्या एका विशेष नियमानूसार या महिलेला ही परवानगी देण्यात आली आहे. या महिलेचे नाव पास्केल असून ती उत्तर फ्रांसमधील सेंट ओमेरची रहिवाशी आहे. काही आठवड्यातच पास्केल मृत मिचेलच्या फोटोसोबत शहराच्या महापौरांसमोर हा विवाह रचणार आहे. लोकांनी या आधी असा विवाह कधीही पाहिला नसेल.
फ्रांसमध्ये विचित्र विवाहाचा कायदा
फ्रांसमध्ये विचित्र पद्धतीने लग्न करण्याचाही एक कायदा आहे. या कायद्यानूसार मृत व्यक्तीसोबत लग्न करता येते. यासाठी मृत व्यक्तीसोबत तुम्ही आजूनही प्रेम करता हे राष्ट्रपतीला पटवून द्यावे लागते. राष्ट्रपती विशेष परिस्थितीत अशा लग्नाला परवानगी देतात.
ही विचित्र लव्ह स्टोरी सविस्तर वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...