(हॉलिवूड फिल्म रोअरमध्ये काम केलेला सिंह नील)
जगातील सर्वात भयावह प्राण्यांमध्ये सामील असलेल्या सिंहाजवळ जाण्याची कल्पनासुध्दा मनाला खाऊन टाकते. कारण डोळ्याची पापणी उघडझाप होताच तो एखाद्याची शिकार करतो. अलीकडेच, दिल्लीच्या प्राणीसंग्रहलायात असाच एक प्रकार घडला होता. एका 20 वर्षीय तरुणाला सिंहाने क्षणात शिकार बनवले होते. परंतु जगातील काही लोक असेही आहेत, जे या सिंह पाळण्याचे शौकीन असतात.
कॅलिफोर्नियाचा रहिवासी दिग्दर्शक नोएल मार्शलने फॅमिलीसुध्दा सामील आहे. सिनेमा बनवण्याचे स्वप्न असलेल्या मार्शलने राहत्या घरात सिंहाला राहण्यास जागा दिली. झाले असे, की 1971मध्ये दाक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर नोएल मार्शल, पत्नी टिप्पी हेड्रेन आणि मुलगी मेलानी ग्रिफिथ यांना सिंहावर एक सिनेमा तयार करायचा होता. त्यांनी सिंहाचे प्रशिक्षक असलेले रॉन ऑक्सलेचा सल्ला घेतला. त्याने मार्शलला घरात सिंह पाळण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून हे कुटुंब नील नावाच्या सिंहासोबत राहत आहे.
घरात सिंह पाळून जवळपास 10 वर्षांनंतर 1981मध्ये मार्शलने एक दिग्दर्शक म्हणून 'रोअर' नावाचा सिनेमा तयार केला. त्यामध्ये त्याची पत्नी आणि मुलीसह इतर कलाकारांनी काम केले होते. सिनेमाच्या शूटिंगवेळी सिंहाने काही कलाकारांना जखमीदेखील केले. मात्र, कुणावरही हल्ला केला नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंहासोबत नोएल आणि त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...