खराब रस्ते ही काही महाराष्ट्र आणि भारताचीच समस्या नाही. त्यातही अनोखे आंदोलन करण्यात भारतीयच पुढे आहेत असेही नाही. जगातील अनेक देशांमध्ये सरकारपर्यंत
आपल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने होत असतात. तुम्ही जे छायाचित्र पाहात आहात, ते आहे लिथुएनियामधील खराब रस्त्यांची अवस्था दर्शविणारे. छायाचित्रात रस्त्यांच्या खड्यात तयार झालेल्या तळ्यांसमोर काही मॉडेल्स फ्रेश होत आहेत. अशाच आंदोलनाची गरज महाराष्ट्रातही आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यात काही गैर नाही.
सोबतचे छायाचित्र हे लिथुएनियाची राजधानी कॉनास (Kaunas) येथे झालेल्या एक विशेष फोटोशूटचा भाग आहे. हे फोटोशूट Z999 या क्रिएटिव्ही ग्रूपने केले होते. त्यांचा उद्देश लिथुएनियाच्या रस्त्यांची दुर्दशा सरकारपर्यंत पोहोचवणे हा होता. त्यासाठी प्रोफेशनल फोटोग्राफरने हे फोटोशूट आयोजित करण्यात आले होते. अर्टूरस अर्टीयुसेन्का आणि यूरिा बॅल्किट यांनी हा इव्हेंट कव्हर केला होता.
पुढील स्लाइडमध्ये तुम्ही पाहू शकता लिथुएनियाच्या रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असलेल्या रस्त्यांवर काही महिला आणि पुरुष अंघोळ उरकत आहेत. त्यामुळे रस्त्याला बाथरुमचे स्वरुप प्राप्त झाले आहे. लिथुएनियामध्ये हे फोटोशुट सध्या चर्चेत आणि लोकांच्या पसंतीस उतरले आहे. लोकांना आता तरी सरकार जागे होईल अशी आशा वाटत आहे.
पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, फनी फोटोशूट