आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या इमारतीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यातून जातो एक्स्प्रेस वे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरं तर जापान म्हटले की, आपल्याला 'लव्ह इन टोकियो' हा चित्रपट आठवतो. 'सायोनारा' तसेच 'ले गई दिल गुडिया जापान की...' हे गाणे लागलीच ओठांवर येतात. परंतु आता जापानची एक नवी ओळख झाले आहे आणि ती म्हणजे गगनचुंबी इमारतींचे राष्‍ट्र...

जापानमध्ये एकपेक्षा एक आकर्षक इमारती आहे. यापैकी एक गगनचुंबी इमारत अशी आहे, की तिच्यामधून एक्स्‍प्रेस हायवे जातो.

ओसाकामधील फुकुशिमा-कू येथील 'गेट टॉवर बिल्डिंग 236 फीट उंच असून 16 मजल्यांची आहे. 'हॅंशिन एक्सप्रेस वे सिस्टम' नामक हायवे याच इमारतीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावरून जातो. विशेष म्हणजे प्रशासन या बिल्डिंग मालिकाला तीन मजल्यांचे भाडे अदा करते.

या इमारतीच डिझाईन अजूसा सेकेई आणि यमातो निशिहारा यांनी केले होते. या गोलाकार इमारतीत डबल कोर कंस्ट्रक्शन करण्‍यात आले आहे. या इमारतीतून एक्स्प्रेस वे जात असल्याने लिफ्ट हायवेच्या तीन मजल्यांवर थांबत नाही.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, या गगनचुंबी इमारतीबाबतच्या रोचक गोष्‍टी..