आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gensler Proposes Floating Thames Airport To Ease Airport In London

ब्रिटिश सरकार लंडनच्या टेम्स नदीवर उभारणार Floating Airport

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2030 पर्यंत हिथ्रो विमानतळावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने त्यापूर्वीच नवीन विमानतळाची उभारणी करणे गरजेचे आहे, असे ब्रिटिश सरकारमधील दळणवळण विभागाने सांगितले आहे. यामुळे लंडनजवळ असलेल्या टेम्स नदीवर फ्लोटिंग एअरपोर्ट उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. या विमानतळावर हिथ्रो विमानतळावरील बरीच उड्डाणे वळविण्यात येणार आहेत. सध्या हिथ्रो विमानतळ 99 टक्के क्षमतेने काम करीत आहे.
पूर्व लंडनमध्ये अशी जागा आहे जेथे अशा प्रकारचे विमानतळ उभारणे शक्य होणार आहे. या विमानतळावर सहा रनवे राहणार असून त्याला लंडन ब्रिटानिया एअरपोर्ट म्हटले जाईल. या विमानतळाची उभारणी करण्यासाठी सुमारे सात वर्षे लागतील आणि त्याला सुमारे 5,600 अब्ज रुपये खर्च येईल असे सांगितले जात आहे.
आर्किटेक्ट नोरमन फोस्टर यांनी या प्रोजेक्टसाठी प्रस्ताव तयार केला आहे. लंडन शहराचे महापौर बेरिस जॉन्सन यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. ब्रिटिश सरकार आणि उद्योगपतींनी प्रस्तावित विमानतळावर समाधान व्यक्त केले आहे.
प्रस्तावित विमानतळाचे डिझाईन बघा पुढील स्लाईडवर...