आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मगरीने अशी केली हिप्पोच्या पिल्लाची शिकार, पाहा जिवाचा थरकाप उडवणारे EXCLUSIVE PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाणघोड्याच्या पिल्लाची शिकार करताना मगर)
दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये एका मगरीने पाणघोड्याच्या पिल्लाचे लचकेच तोडले. हा लहान पाणघोडा पाण्यामध्ये खेळत असताना तो या मगरीच्या तावडीत सापडला. मगरीने या पाणघोड्याच्या पिल्लास तोंडात पकडून पाण्यावर असे काही आपटले जसे की एखादे खेळणे कोणी आपटेल. त्याक्षणी तेथेच उपस्थित असलेले रॉलॅंस रोस या फोटोग्राफरने या संपूर्ण क्षणाची क्रमवार छायाचित्रे घेतली आहेत.
रॉलँस रोस म्हणाले, मी जसे मगरीला पाण्याच्या बाहेर येताना पाहिले, तेव्हा मला तिच्या तोंडात काही तरी असल्याचे लक्षात आले. जवळपास 25 मिनिटापर्यंत ही मगर या पाणघोड्याच्या पिल्लाला आपल्या जबड्यात पकडून इकडून-तिकडे फिरवत होती. पाण्यात जाण्यापूर्वी हे पिल्लू जिवंत होते की नाही मला माहित नाही. मात्र मगर या पिल्लाला घेऊन गुपचूप पाण्यात निघून गेली.
या संपूर्ण क्षणाची क्रमवार फोटो... पुढील स्लाईडमध्ये