आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुक्या प्राण्याने असा दिला आपल्या आवडत्या व्यक्तीला शेवटचा निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डचू प्राणीसंग्रालयात काम करणा-या एका 54 वर्षीय मारियो नावाच्या कर्माचा-याला कॅन्सर हा गंभीर आजार जडलेला होता. बुधवारी जेव्हा तो कर्मचारी आपल्या बेडवर शेवटचा श्वास घेत होता तेव्हा प्राणीसंग्रालयातील एका जिराफने त्याला काही अशाप्रकारे शेवटचा निरोप दिला. या प्राणीसंग्रालयातील सर्व प्राणी मारियोला ओळखत होते.
मारियो नेदरलँडच्या रोटोरडॅम प्राणीसंग्रालयात अनेक वर्षांपासून काम करत आहे. काही वर्षांपूर्वी त्याला ब्रेन कॅन्सर झाला होता. मृत्यूचा सामना करणा-या मारियोने हॉस्पिटलच्या कर्मचा-यांना सांगितले होते, की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला प्राणीसंग्रालयात पोहोचवावे जेणेकरून तो त्याच्या आवडत्या प्राण्यांना जवळून बघू शकेल. मारियोची इच्छा हॉस्पिटलच्या कर्मचा-यांनी पूर्ण केली. त्यावेळी मारियोचे सर्व कुटुंबीय प्राणीसंग्रालयात त्याला भेटण्यासाठी आले होते.
द अ‍ॅम्बुलन्स विश फाउंडेशनने मारियोची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. या संस्थेचे संस्थापक कीज वेल्डबोयरने सांगितले, की प्राणीसंग्रालयातील प्राण्यांनी त्याच्यावर खूप प्रेम केले. त्यांनाही कदाचित ठाऊक होते, की मारियो आता काही दिवसच आपल्यात राहणार आहे.
मानसिक रुपाने अस्वस्थ मारियोने सर्व आयुष्य या प्राण्यांसोबत घालवले. या भावूक क्षणांनंतर काही वेळातच मारियोने या जगाचा निरोप घेतला. परंतु प्राणीसंग्रालयातील प्राण्यांनी त्याच्यावर किती प्रेम हे दर्शवणारी छायाचित्रे इंटरनेटवर सर्वत्र बघितली जात आहे.
व्यक्ती आणि प्राणी यांच्यातील भावून क्षणांची काही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...