आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज वसुलीसाठी उचलल्या जायच्या तरुणी, उघडपणे केला जायचा लिलाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर कपड्यांमध्ये नटलेल्या पण पिंज-यात कैद असलेल्या या आहेत जापानी तरुणी. सावकाराचे कर्ज चुकवू न शकलेल्या कुटुंबातील या तरुणी आहेत. कर्ज चुकवू न शकल्यामुळे अशा कुटुंबातील तरुणींची बळजबरीने बाजारात बोली लावली जायची. लीलावात मिळाले पैसे सावकाराला दिले जायचे. जापानच्या योशिवारा शहरातील हे फोटोज 1900 व्या दशकातील असून हे त्याकाळातील ब्लॅक अँड व्हाइट फोटोज जापानचे प्रसिद्ध फोटोग्राफर योजोकी यांनी कलर्ड केले आहेत. 
 
वेश्यालयात विकल्या जायच्या तरुणी..
- जापानचे योशिवारा शहर हे त्याकाळात देशातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया म्हणून प्रसिद्ध होते.
- येथे तरुणींची खरेदी-विक्री हे दैनंदिन होत असे. शिवाय तरुणींचा लीलाव हा उघडपणे चालायचा.  
- या तरुणी कर्जबाजारी झालेल्या कुटुंबातील असायच्या. सावकाराचे कर्ज चुकवू न शकल्याने कर्जबाजारी कुटुंबातील तरुणींचा लीलाव केला जायचा.  
- इतकेच नाही तर कर्जाची रक्कम अधिक असल्याच सावकार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गुलाम बनवत असे. या लोकांना मरेपर्यंत गुलामी करावी लागायची.  
- श्रीमंत लोक वेश्या बनवून त्यांना स्वतःसोबत ठेवायचे आणि नंतर वेश्यालयात विकून टाकायचे. या तरुणींचे आयुष्य उद्धवस्त होत असे. त्या स्वतःच्या घरी कधीही परतू शकत नव्हत्या. 
- योशिवारा शहरातील ही हृदयद्रावक परिस्थिती दुस-या महायुद्धानंतर बदलली. त्यानंतर मनुष्याच्या खरेदी-विक्रीवर येथे बंदी घालण्यात आली.  

पुढील स्लाईड्सवर बघा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...