आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सगळे म्हणतात 'Killer', हिने केला आहे मासे मारण्याचा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मासे पकडण्याचा विक्रम करणारी महिला. - Divya Marathi
मासे पकडण्याचा विक्रम करणारी महिला.
लंडन - सवडीच्या वेळेत समुद्रात माशांची शिकार करण्याची हौस असणारी एक 28 वर्षांची महिला सध्या चर्चेत आहे. व्हॅलेन्टाइन थॉमस नावाची ही महिला लंडनमध्ये राहते. तिने मासे मारण्याचा जागतिक विक्रम केला आहे. प्राण्यांच्या हक्कासाठी झगडणारे तिला 'किलर' म्हणून संबोधत असल्याने ती चर्चेत आहे. अनेक लोक तिला घाणेरड्या कमेंट्स देत असल्याने ती त्रस्तही आहे. त्याचवेळी हे काम पाहून अनेकांकडून लग्नाच्या ऑफर येत असल्याचे तिने सांगितले आहे.

ही महिला समुद्रात निर्भयपणे मासे पकडण्याचे अनेक फोटो सोशल साईट्सवर शेअर करत असते. त्या फोटोंवर कॉमेंट्स करून लोक तिला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. थॉमस म्हणाली की, लोक माझ्यावर सेक्सी कॉमेंट्स करता, माझा द्वेष करतात, पण मला काही चांगल्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. मासे मारण्याबरोबरच ते शिजवून खायलाही आवडत असल्याचे ती सांगते. जे मासे खात नाही, त्यांची कधीही शिकार करत नाही, असे उत्तर ती प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना देते.

पहिल्या वेळी जेव्हा व्हॅलेंटाईन मासे पकडण्यासाठी गेली होती, तेव्हा वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ती पार्टनरपासून फार दूरवर गेली होती. तिला पोहायचे होते, पण शरीर साथ देत नव्हते. पण नंतर तिला एक दोरी मिळाली आणि त्या दोरीच्या मदतीने ती किनाऱ्यापर्यंत पोहोचली. ती अटलांटीक तसेच साऊथ आफ्रिकेच्या समुद्रातही मासे मारण्यासाठी गेली आहे. 2013 मध्ये तिने अटलांटिक समुद्रात सर्वात मोठा मासा मारण्याचा विक्रम केला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, महिलेचे निवडक PHOTOS
बातम्या आणखी आहेत...