आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्त्याच्या बछड्यांनी 99 km/h वेगाने धावून केवळ 15 सेकंदात अशी केली शिकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(काळवीटाची शिकार करताना चित्ता)
चित्त्याच्या दोन बछड्यांनी 99 किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने धावून केवळ 15 सेकंदात काळवीटाची शिकार केली. यादरम्यान मादी चित्त्याने दूरवरून आपल्या दोन्ही बछड्यांवर नजर ठेवलेली होती. ही घटना केन्याच्या मसाई मारा नॅशनल रिजर्व्हची आहे. इटॅलिअन फोटोग्राफर मस्सिमो मई या घटनेचे फोटो क्लिक केले.
फोटोग्राफर मस्सिमो सांगतो, की एक मादी चित्ता आपल्या दोन्ही बछड्यांसोबत शिकारीच्या शोधात निघाली होती. त्यावेळी त्यांची नजर काळवीटावर पडली. केवळ 3 मिनीटांत चित्त्याचे दोन बछडे काळवीटजवळ पोहोचले. 15 सेकंदात त्यांनी काळवीटाला आपले तावडीत घेतले आणि शिकार केली. त्यानंतर दोन्ही बछडे उड्या मारायला लागले, जसे की त्यांनी शिकार केल्याचा आनंदोत्सव साजरा केला.
काळवीटने स्वत:ला वाचवण्यासाठी बछड्यांवर अनेक वार केले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिकारीनंतर मादी चित्ता तेथे पोहोचली आणि तिने आपल्या बछड्यासह शिकार केलेल्या काळवीटाला सावलीच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काळवीटाचे वजन जास्त असल्याने तिने बछड्यांसह उन्हातच शिकार खाण्याचा आनंद लुटला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेची क्षणा-क्षणांची छायाचित्रे...