(फोटो- चीनमधील कोरियन रेस्तरॉंमध्ये महिला ग्राहक.)
विचित्र, जगावेगळ्या खाद्य पदार्थांसाठी, इंटेरिअरसाठी, ड्रिंकसाठी किंवा इतर काही अफलातून कारणांसाठी प्रसिद्ध करणारे जगभरात अनेक रेस्तरॉं आहेत. वेगळेपणाची आवड असणाऱ्या ग्राहकांची अशा ठिकाणी कायम गर्दी असते. असेच एक विचित्र रेस्तरॉं चिनमध्ये आहे. येथे सुंदर ग्राहकाला मोफत जेवण दिले जाते.
चिनच्या हेनान प्रांतातील झेंगझोऊ येथे हे कोरिअन रेस्तरॉं आहे. रेस्तरॉंत आलेला ग्राहक सुंदर आहे, की नाही याचा निर्णय घेण्यासाठी या हॉटेलमध्ये कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिक ठेवण्यात आले आहे.
या रेस्तरॉंत आलेल्या ग्राहकाचा आधी फोटो घेतला जातो. त्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिकचे कर्मचारी ठराविक कालावधीत आलेल्या या फोटोंपैकी पाच सुंदर ग्राहकांचे फोटो निवडतात. त्यांना मोफत जेवण दिले जाते. चीनच्या सोशल मीडियात या हॉटेलची खिल्लीही उडवण्यात आली आहे. काहींनी या सुविधेवर कडाडून टिकाही केली आहे. सौंदर्याची योग्य व्याख्या केली जात नाही, असे टिकाकार म्हणतात.
यापूर्वीही चीनमधील एका रेस्तरॉंने अशीच अफलातून ऑफर दिली होती. लठ्ठ माणूस आणि बारीक महिलेला येथे सुट दिली जात असे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या रेस्तरॉंची छायाचित्रे...