आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न सोडून नवरदेवाने तलावात घेतली उडी, कारण ऐकून व्हाल भावूक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वांच्या आयुष्यात लग्नाचा दिवस अतिशय महत्वाचा असतो. या दिवशी आपण चांगले दिसावे हा सर्वांचा प्रयत्न असतो. कारण सर्वांची नजर नवरदेव आणि नवरीवर असते आणि फोटोही काढण्यात येतात. त्यामुळे कुणीच आपल्या लुकसोबत छेडछाड करत नाही. परंतु, कॅनडा येथील जोडपे क्लेटॉन आणि ब्रिटनी कुक आपल्या लग्नाच्या दिवशी पार्कमध्ये फोटो काढत होते, तेवढ्यात नवरदेवाने अचानक पाण्यात उडी मारली.

असे काय झाले ज्यामुळे नवरदेवाने मारली पाण्यात उडी...
क्लेटॉन आणि ब्रिटनी आपल्या लग्नाचे फोटो काढत होते, तेव्हा नवरदेवाची नजर नदीच्या दिशेने गेली. तिथे एक मुलगा पाण्यात डूबत होता. क्लेटॉनने काहीही विचार न करता पाण्यात उडी मारली. त्याने त्या मुलाला डूबण्यापासून वाचवले आणि सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या पत्नीने सांगितले की जेव्हा ते फोटो काढत होते तेव्हा अचानाक क्लेटॉनने पाण्यात उडी मारली. हे पाहून तीला धक्का बसला आणि काहीवेळासाठी ती घाबली देखील होती. परंतु, जसे तिने पाहिले की, क्लेटॉन त्या मुलाला वाचवण्यासाठी गेले आहे, तिच्या जिवात जिव आला.
 
मुलगा कसा पडला...?
तो मुलगा सोबतच्या मुलांसोबत नदीच्या किणाऱ्यावर खेळत होता, तेवढ्यात पाय घसरून तो नदीत पाण्यात पडला. जसे नवरदेवाने त्याला पाण्यातून काढून बाहेर आणले, तो तिथून निघून गेला.

सोशल मीडियावर लोकांनी केले पसंत...
नवरदेवाने जेव्हा मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली आणि त्या मुलाला बाहेर आणले तेव्हा फोटोग्राफरने त्याचे फोटो टिपले आणि सोशल मीडियावर त्याचे कौतूक करत शेअर केले. लोकांनीही सोशल मीडियावर नवरदेव क्लेटॉनची तोंडभरून प्रशंसा केली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा या प्रसंगाचे फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...