आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंबोडियामध्ये तळलेले कोळी, पेरूमध्ये डुक्कर, हे आहेत किळसवाणे वाटणारे पदार्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्याचे शौकीन आपण नेहमीच पाहत आलो आहोत. कोणत्याची ठिकाणी एखादा स्वादीष्ट खाद्यपदार्थ दिसला, की लगेच खायला सुरुवात करतात. परंतु असेच फुट लव्हर जगातील प्रत्येक कान्याकोप-यात तुम्हाला दिसतील. खाण्याच्या बाबतीत प्रत्येकाची आवड वेगळी असते.
दाळ-भात, चपाती-भाजीशिवाय जगातील अनेक भागांत किडे, साप, उंदीर आणि डुक्कर यांसारखे प्राणी आवडीने खाल्ले जातात. चीन जगात विचित्र खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. परंतु जापान कंबोडिया, ब्राझीलमध्येसुध्दा असे पदार्थ खाणा-या लोकांची संख्या कमी नाहीये. काही खाद्यपदार्थ असेही आहेत जे खाणे तर दूरच पाहूनसुध्दा किळसवाणे वाटते. मात्र आज या डिश सर्वात फेव्हरेट बनल्या आहेत.
कंबोडियामधील लोकसुध्दा खाण्याचे शौकीन आहेत. येथील मार्केटमध्ये वियर्ड फूड सहज मिळते. हे फूड्स लोक मोठ्या आवडीने खातात. येथे विशेषत: कॉकटेल पार्टीमध्ये स्नॅक्स म्हणून झिंग्याची डिश मिळते. शिवाय, कोळी, माकड यांचे मेंदूसुध्दा लोक आवडीने खातात.
तळलेल्या कोळी- कंबोडिया
कंबोडियामध्ये हाताच्या तळव्याच्या आकाराच्या कोळीपासून तयार नाश्ता मिळतो. नोम पेह मार्केटमध्ये कोळीपासून बनलेली डिश खुलेआम विकतात. दुपारचा नाश्ता करण्यासाठी जास्तित जास्त लोक या खाद्याला पसंतील देतात. खमेर रुज शासनाच्या काळात येथील अनेक लोक तणावाचे शिकार झाले होते. तणावातून बाहेर येण्यासाठी त्यांनी कोळीपासून बनलेले पदार्थ खाण्यास सुरुवात केली आणि त्यांना याचा स्वाद आवडला. तेव्हापासून येथे कोळी खाण्याचे प्रथा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या देशातील इतर विचित्र खाद्यपदार्थांविषयी...