आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपनंतर या आवस्थेत पार्लरमध्ये पोहोचली तरुणी, 13 तास लागले मेकओव्हरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमभंगाचा एवढा धक्का बसला की या मुलीला केस विंचरण्याचेही भान राहिले नाही. - Divya Marathi
प्रेमभंगाचा एवढा धक्का बसला की या मुलीला केस विंचरण्याचेही भान राहिले नाही.
दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया... 
मेरे सय्या जीं से आज मैने ब्रेक अप कर लिया...

... आंसू जो सुखें तो सीधे पार्लर गयी 
पार्लर में जाके शाँपू जमकर किया...
 
असेच काहीसे अमेरिकेच्या स्टेट आयोव्हा येथे घडले आहे. येथील एका ब्यूटी पार्लर चलवणाऱ्या महिलेने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका प्रकरणाचा खुलासा केला आहे. कॅली ऑलसनकडे काही दिवसांपूर्वी एक 16 वर्षांची मुलगी अशा परिस्थितीत आली की तिला पाहून सर्वांनाच धक्का बसला. 
 
काय आहे प्रकरण 
- कॅलीने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये 16 वर्षांच्या या मुलीची कहाणी शेअर केली आहे. 
- ही मुलगी तिचा मेकओव्हर करण्यासाठी कॅलीकडे आली होती. जेव्हा ती पार्लरमध्ये आली तेव्हा तिचे केस विस्कटलेले होते. त्यांचा एवढा गुंता झाला होता की जणू काही ते पक्षांचे घरटे झाले होते. 
- मुलीने कॅलीला सांगितले की बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपनंतर तीची ही हालत झाली आहे. ब्रेकअपनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. दिवस-दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहात होती. तिला केस विंचरणेही मोठे कष्टाचे काम वाटत होते. 
 
13 तास लागले मेकओव्हरला
- कॅली ऑलसने प्रेमात धोका मिळालेल्या या षौडशी तरुणीचा मेकओव्हर केला. त्यासाठी तिला तब्बल 13 तास लागले होते.
बातम्या आणखी आहेत...