आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघावे ते नवल : दाढी-मिशी असलेल्या भारतीय तरुणीने केलंय ब्रायडल PHOTOSHOOT!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः ब्रायडल लूकमध्ये हरनाम कौर)

शरीरावर पुरुषांप्रमाणे केस असल्यामुळे ब्रिटनमध्ये भारतीय वंशाची 24 वर्षीय तरुणी चर्चेचा विषय बनली आहे. हरनाम कौर असे या पीडित तरुणीचे नाव आहे. हरनामच्या चेहर्‍यावर पुरुषांप्रमाणे दाढी-मिशी आहे. हरनामला असलेला आजार डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान ठरले आहे. हरनाम कौरने अलीकडेच ब्रायडल फोटोशूट करत सौंदर्याला कुठलेही निकष नसतात, हे सिद्ध केलं आहे. प्रत्येक जण परफेक्ट नसतो, असंच दाढी असलेल्या हरनाम कौर हिचं म्हणणं आहे.
शीख हरनामला समाजातील बांधवांकडून जीव घेण्याच्या धमक्याही आल्या, मात्र त्यांना भीक न घालता तिने दाढी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दाढी आल्यावर तिने वॅक्सिंगचा पर्यायही निवडला, मात्र कुठलाही तोडगा न निघाल्याने तिने हे रुप स्वीकारलं.
'पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम'ने पीडित आहे हरनाम...
'बर्कशर' येथील रहिवासी हरनाम कौर ही 'पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम'ने पीडित आहे. हा आजार जडलेल्या तरुणींच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात केस उगतात. हरनाम अवघ्या 11 वर्षांची होती. तेव्हापासून तिच्या चेहर्‍यावर दाढी दिसू लागली होती. त्यानंतर पुरुषांप्रमाणे तिच्या छाती आणि हातापायांवर केस पसरले. हरनाम कौरच्या चेहर्‍यावर दाढी-मिशी असल्यामुळे मादकता आणि सौंदर्यात भर पडली आहे. चेहर्‍यावरील केस कापण्याचा विचार तिच्या मनात कधीच आला नसल्याचेही हरनाम कौर सांगते.
शाळेत टिंगल उडवायची मुले...
हरनाम डोक्यावर पगडी बांधते. सार्वजनिक ठिकाणी ती सहज वावरते. ती तरुणी असल्याचे कोणाच्याच लक्षात येत नाही. हरनाम ही स्त्री असल्याचे मोजक्याच लोकांना माहीत आहे. हरनाम म्हणाली, चेहर्‍यावर आलेल्या नैसर्गिक दाढी-मिशीमुळे शाळेतील मुले-मुली तिची ‍टिंगल उडवत होते. मात्र, ती खचली नाही. तिने दाढी-मिशी वाढवण्याचा निश्चय पक्का केला. यापूर्वी हरनाम आठवड्यातून दोनता 'वेक्सिंग' करत होती. मात्र, आता तिने वेक्सिंग करणेही सोडून दिले आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, हरनामने केलेल्या ब्रायडल फोटोशूटची आणि खासगी आयुष्यातील खास छायाचित्रे...