आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: खडकांतून-नद्यांमधून धावते ही ट्रेन, दिसतात अद्भुत नजारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॅनाडामध्ये चालणारी रॉकी माऊटेनिअर ट्रेन)
बँकुवर- कॅनाडामध्ये एक अशी ट्रेन धावते, जी देशातील सर्व सुंदर ठिकाणांची सैर करून आणते. या ट्रेनमध्ये प्रवास करणे अविस्मरणीय अनुभव असतो आणि तिने सातवेळा 'वर्ल्ड लिडींग ट्रॅव्हल एक्सपेरियन्स'चा किताब नावी केले आहेत. कॅनाडिअन रॉकिज रुटवर या ट्रेनला रॉकी माऊंटेनिअर कंपनी चालवते. काही ट्रेन बँकुवरपासून तर काही सिएटलपासून धावतात आणि टोरंटो, मॉन्ट्रिअल, कम्लूप्स, बॅन्फ जम्पर आणि दुस-या परिसरातून जाते.
सांगितल्या जाते, की या प्रवासादरम्यान जंगलात काही ठिकाणी प्राणी दिसले तर चालक ट्रेनची गती कमी करतो. जेणेकरून प्रवाशांना प्राणी पाहता यावेत. या मार्गामध्ये सुंदर नद्या, खडके, पर्वत आणि तलाव लागतात. ट्रेन ज्या परिसरातून जाते, ते विकासाच्या बाबतीत खूप कमी प्रभावित आहेत. म्हणून पर्यटकांना जास्तित जास्त नैसर्गिक नजारे पाहायला मिळतात. मध्येच ट्रेन अनेक ऐतिहासिक ठिकाणांहूनसुध्दा धावते, मात्र ही ट्रेन केवळ एप्रिल ते ऑक्टोबर याच कालावधीत चालू असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सुंदर रेल्वे रुटचे खास PHOTOS...