आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फोटोग्राफरने दाखवली स्क्वाटमध्ये राहणा-या लंडनच्या लोकांची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लंडनच्या एका अवैध्य घरात झोपलेली तरुणी)
दक्षिण आफ्रिकेच्या एका फोटोग्राफरने लंडनमध्ये राहणा-या लोकांचे वेगळ्या प्रकारचे आयुष्यात कॅमे-यात टिपले. कोरिना केर्न नावाच्या या फोटोग्राफरने, जून्या, पडक्या अशा अवैध्य घरात राहणा-या लोकांचे आयुष्य दाखवले आहे. मात्र, या लोकांचे आयुष्य भारतातील बेघर लोकांपेक्षा चांगले असल्याचे दिसून आले.
परंतु त्यांना कधी-कधी बिघडेलेल्या परिस्थितीचासुध्दा सामना करावा लागतो. लंडनमध्ये अशा लोकांना स्क्वाटिंग कम्युनिटी नावाने ओळखले जाते. अशा ठिकाणांना स्क्वाट म्हटले जाते. गरीबच नव्हे अनेक तरुण अॅडव्हेंचर, मैत्री, स्वातंत्र्यासाठीसुध्दा असे राहणे पसंत करतात.
या लोकांचे आयुष्य जवळून जाणून घेण्यासाठी फोटोग्राफर कोरिना स्वत: केटीशच्या या भागात काही दिवस राहिला. केटीश स्क्वाटमध्ये जवळपास ३० लोक आणि ३ श्वान एकत्र राहतात. शिवाय त्याने लंडनच्या अशाच ६ स्क्वाटचा दौरा केला.
कोरिनाने सांगितले, वाढत्या घराच्या किमती आणि घर भाड्यांमुळे लोक अशा घरात राहणे पसंत करतात. अनेकदा अशा इमारतीत राहणा-या लोकांमध्ये घट्ट नाते बनते. या इमारतीत प्रायव्हसीसाठी कपड्यांचा वापर केला जातो. काही लोक तंबूसारखे छोटे घरदेखील बनवतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशा घरात राहणा-या लोकांचे आयुष्य...