आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Have A Look On The Life Of Niger S Nomadic Tribes

PIX : हे आहेत नायजरमधील भटक्या जमातीचे लोक, फोटोग्राफरने कॅमे-यात बंदिस्त केले आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आफ्रिकेतील नायजरमधील भटक्या जमातीचे लोक)
नियामी (नायजर) : आफ्रिका देशातील नायजरच्या वोडाबे नावाच्या भटक्या जमातीच्या लोकांचे आयुष्य न्यूयॉर्कच्या एका फोटोग्राफरने आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले आहे. फोटोग्राफर टेरी गोल्ड यांनी जमातीच्या गुएरेवोल या फेस्टिव्हलमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यांचे आयुष्य जवळून पाहिले. वोडाबे ही जमात दक्षिण नायजरमध्ये वास्तव्याला आहे. फोटोग्राफरने सांगितले, जवळजवळ एक आठवडा चालणा-या या फेस्टिव्हलमध्ये पुरुष ट्रेडिशनल कपडे परिधान करतात आणि चेह-याला रंग लावतात. नटूनथटून हे पुरुष तासन्तास परफॉर्म करतात. पुरुषांच्या सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी स्त्रिया परिक्षकाची भूमिका वठवत असतात. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर फोटोग्राफरला येथे येणे शक्य झाले होते.
नायजर टुरिस्ट प्लेस अद्याप विकसित झालेले नाही. येथे लिबियाहून येणा-या दहशतवाद्यांचा धोका असतो. फोटोग्राफर टेरी गोल्ड नायजरमध्ये असताना 18 जवान रायफलसोबत त्यांची सुरक्षा करत होते. ज्या ट्रकमधून त्या या ठिकाणी पोहोचल्या, त्यामध्ये ऑटोमॅटिक 50 एमएमचे रायफल फिट करण्यात आले होते. फोटोग्राफरसोबत दोन स्त्रिया होत्या. पावसाळ्यात ही जमात एका ठिकाणी राहात असल्याचे फोटोग्राफरने सांगितले.
पुढे पाहा, या भटक्या जमातीचे आयुष्य छायाचित्रांमध्ये...