आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील सर्वात वाईट अवस्थेतील प्राणीसंग्रहालय, अशा परिस्थितीत राहतात प्राणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्मेनियामधील प्राणीसंग्रहालय - Divya Marathi
अर्मेनियामधील प्राणीसंग्रहालय
 
यरेवन- यूरोपिअन देश अर्मेनियामध्ये एक असे प्राणीसंग्रहालय आहे, ज्याला जगातील सर्वात सॅडेस्ट झू म्हटले जाते. मात्र, याचा आकार खूप लहान आहे आणि येथे केवळ 3 सिंह, 2 अस्वल आणि 2 डुक्कर राहतात. अलीकडेच, इंटरनॅशनल मीडियामध्ये या प्राणीसंग्रहालयाची स्टोरी छापली होती. त्यानंतर याचे फोटो सोशल साइट्सवर व्हायरल होत आहेत. 
 
का म्हटले सर्वात वाईट अवस्थेतील प्राणीसंग्रहालय...
डेली मेलने याला सर्वात वाईट अवस्थेतील प्राणीसंग्रहालय म्हटले आहे. येथे प्राण्यांना व्यवस्थित खायला दिले जात नाही. समोर आलेल्या फोटोंमध्ये प्राण्याची अवस्था दिसते. काही प्राणी भिंतीवर डोके आपटताना दिसतात. रिपोर्टनुसार प्राण्यांच्या डोक्यावरसुध्दा याचा परिणाम होत आहे आणि त्यांची मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. 
 
कसे झाली अशी परिस्थिती? 
अर्मेनियाच्या ग्यूमरीमध्ये एका अब्जोधिशाने या प्राण्यांना जंगल थीमवर होणा-या पार्ट्यासाठी ठेवले होते. या पार्ट्यासाठी या प्राण्यांचा वापर केला जात होता. तो आपल्या फ्रेंड्सना या प्राण्यांच्या माध्यमातून जंगलाचा फील देत होता. मात्र नंतर त्याने प्राण्यांना सोडून दिले. आता एक वयस्कर कपल या प्राण्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक अधिका-यांनी, या प्राण्यांच्या मदतीसाठी नकार दिला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या प्राणीसंग्रहालयाचे PHOTOS...